व्वा रे आई ! विवाहबाह्य संबंधांची वाच्यता होऊ नये म्हणून पोटच्या मुलीचाच छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:55 IST2025-08-13T12:55:41+5:302025-08-13T12:55:41+5:30
मुलीने डायरीत लिहिल्याने प्रकरण आले उजेडात

व्वा रे आई ! विवाहबाह्य संबंधांची वाच्यता होऊ नये म्हणून पोटच्या मुलीचाच छळ
नवी मुंबई : विवाहबाह्य संबंधाची मुलीकडून वाच्यता होऊ नये, यासाठी आईनेच १२ वर्षीय मुलीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. मुलीने तिच्यासोबत घडत असलेल्या घटना डायरीत नोंद केल्या असून, ही डायरी वडिलांच्या हाती लागल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली असून, पोटच्या मुलीचा छळ करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
ऐरोली परिसरात राहणाऱ्या कुटुबातील महिलेचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. याची चाहूल तिच्या १२ वर्षीय मुलीला लागली होती. तिच्याकडून वडिलांना सांगितले जाऊ नये, यासाठी महिला पोटच्या मुलीला सतत दहशतीखाली ठेवत होती.
वडिलांनी केली तक्रार
डायरी वाचल्यावर वडिलांना मुलीचा होत असलेला छळ लक्षात येताच त्यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अल्पवयीन मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे.
रबाळेमध्ये गुन्हा दाखल
तिला विनाकारण मारहाण करणे, जेवण न देणे, आजारी असल्यास उपचार न करणे असे प्रकार सुरू होते. शिवाय तिला सतत मारण्याची धमकी दिली जात होती.
यामुळे मानसिक धक्क्यात गेलेली ही मुलगी रात्री-अपरात्री झोपेत घाबरून दचकून उठत असे.