शॉकीेग! मोबाईल वापरावरून आई रागावली, १२ वर्षाच्या मुलीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 15:03 IST2022-10-13T15:02:55+5:302022-10-13T15:03:33+5:30
आईने रागावल्यामुळे मुलगी निराश झाली होती

शॉकीेग! मोबाईल वापरावरून आई रागावली, १२ वर्षाच्या मुलीची आत्महत्या
नवी मुंबई : येथील वाशी मध्ये राहणाऱ्या १२ वर्षाच्या मुलीस मोबाईल वापरल्यामुळे आईने समज दिली होती. त्यामुळे, नाराज झालेल्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या मुलीने परिचीत व्यक्तीचा मोबाईल वापरल्याचे निदर्शनास आल्यामुळे आई तीच्यावर रागावली होती. मोबाईलचा वापर करू नये अशी समज दिली होती. यामुळे मुलगी नाराज झाली होती.
आईने रागावल्यामुळे मुलगी निराश झाली होती. त्यातूनच, बुधवारी सायंकाळी घरात कोणी नसताना तीने ओढणीने घरातील लोखंडी पाईपला गळफास लावून घेतला. घरातील सदस्यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलीला नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयात नेले. तेथे साडेसात वाजता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी वाशी रुग्णालयात नोंद करण्यात आली आहे.