महापालिका रुग्णालयातील डॉक्टरचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 23:48 IST2019-05-28T23:48:06+5:302019-05-28T23:48:11+5:30
महापालिकेच्या रुग्णालयामध्ये कार्यरत डॉक्टरचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

महापालिका रुग्णालयातील डॉक्टरचा विनयभंग
नवी मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयामध्ये कार्यरत डॉक्टरचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वाशी येथील जॉगर्स पार्कमध्ये महिला डॉक्टरला आरोपीने शनिवारी जबरदस्तीने बीअर पाजण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यानंतर संबंधिताने स्वत: बीअर पिऊन महिलेची छेड काढण्यास सुरवात केली. संबंधिताला धक्का देऊन महिलेने रुग्णालयात पलायन केले. आरोपीने रुग्णालय आवारामध्ये येऊनही छेड काढली. या घटनेविषयी सोमवारी पीडित महिलेने तक्रार केल्यावर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.