शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरला म्हणून केली त्याची निर्घृण हत्या

By admin | Updated: July 18, 2015 23:21 IST

तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे सूत्रकारलगतच्या जंगलात २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा निर्घृण हत्या केलेला मृतदेह आढळून आला. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला

तलासरी : तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे सूत्रकारलगतच्या जंगलात २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा निर्घृण हत्या केलेला मृतदेह आढळून आला. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच तलासरी पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याचा छडा लावून मृतदेहाची ओळख पटवून दोन आरोपींना गजाआड केले तर उर्वरित दोन फरारी आरोपींचा तपास पोलीस करीत आहेत.केंद्रशासित प्रदेशातील वेळगाव येथील कारखान्यात काम करणाऱ्या सुनील विजयेंद्र खैरपाल या तरुणाची निर्घृण हत्या केलेला मृतदेह सूत्रकारमध्ये आढळून आला. प्रथम अनोळखी इसम म्हणून दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास तलासरी पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक घनश्याम आढाव व पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांनी तत्काळ करून मृतदेहाची ओळख पटविली व अधिक तपासाकरिता सुनील यांच्या कारखान्यातीलच मोहम्मद जाहीर मोहम्मद मुसाफिर अन्सारी, रा. सुरंगी यांच्याशी मोबाइलचोरीवरून वाद झाल्याचे कळले.सुनील खैरपाल याने आपला मोबाइल चोरला, या रागातून मोहम्मद जाहीर तसेच अरुण सुकऱ्या पवार यांनी इतर दोघांच्या मदतीने सुनील यास मारहाण करून मोटारसायकलवर बसवून सूत्रकारमधील जंगलात आणून तीक्ष्ण हत्याराने तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. याबाबत, मोहम्मद जाहीर मोहम्मद मुसाफिर अन्सारी व अरुण सुकऱ्या पवार यांना अटक केली असून अजून दोन फरारी आरोपींचा तपास तलासरी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)