विमानतळ-बाधितांसाठी मोबाइल अॅप
By Admin | Updated: September 14, 2015 23:48 IST2015-09-14T23:48:44+5:302015-09-14T23:48:44+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष मोबाइल अॅप तयार करण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. या अॅपद्वारे

विमानतळ-बाधितांसाठी मोबाइल अॅप
नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष मोबाइल अॅप तयार करण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. या अॅपद्वारे प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भूखंडाचा सविस्तर तपशील पाहणे सोपे होणार आहे. सिडकोच्या या उपक्रमाचे विमानतळबाधितांनी स्वागत केले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना पुष्पकनगर येथे २२.५ टक्के विकसित भूखंड देण्यात येणार आहे. या भूखंडांची सोडत प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे. जवळपास एक हजार प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. तर विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या गावांतील सुमारे ३५00 घरांचे उलवेजवळील वाहळ येथील ७३ हेक्टर जागेवर पुनर्वसन करण्यात येणार आहे.
अॅपद्वारे संबंधित प्रकल्पग्रस्ताला त्याला वाटप झालेल्या भूखंडांचा तपशील मोबाइलवर पाहता येणार आहे, अशी माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली. (प्रतिनिधी)