खारघर टोल प्लाझावर मनसेची धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 15:17 IST2018-07-12T15:04:04+5:302018-07-12T15:17:38+5:30
खड्डे दूरुस्त न केल्यास टोल बंद पाडण्याचा इशारा

खारघर टोल प्लाझावर मनसेची धडक
पनवेल : खारघर टोल प्लाझावर गुरुवारी ( 12 जुलै) मनसेने धडक दिली. यावेळी सायन पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे दूरुस्त न केल्यास टोल बंद पाडण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जो पर्यत खड्डे बुजविण्याचे आश्वासन देत नाहीत तो पर्यंत येथून जाणार नसल्याचे यावेळी मनसैनिकांनी सांगितले. यावेळी ज़िल्हाध्यक्ष अतुल भगत, खारघर शहर मनसेचे प्रसाद परब आदीसह मनसैनिक उपस्थित होते.