स्थलांतरामुळे सात जिल्ह्यांवर वाढला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:16 AM2020-06-01T00:16:31+5:302020-06-01T00:16:39+5:30

स्थानिक यंत्रणेवर परिणाम : पोलिसांकडून दिले जाणारे परवाने थांबवले

Migration has increased tensions in seven districts | स्थलांतरामुळे सात जिल्ह्यांवर वाढला ताण

स्थलांतरामुळे सात जिल्ह्यांवर वाढला ताण

Next

सूर्यकांत वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लॉकडाउनमध्ये राज्यांतर्गत स्थलांतरासाठी मिळालेल्या संधीचा फायदा घेत अनेकांनी गावाकडे धाव घेतली आहे. याचा परिणाम अनेक जिल्ह्यांतील लोकसंख्येवर झाल्यामुळे तिथल्या स्थानिक यंत्रणेवर कोरोना नियंत्रणाचा ताण पडू लागला आहे. परिणामी नवी मुंबईसह मुंबईमधून सात जिल्ह्यांत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या पोलिसांकडून थांबवण्यात आल्या आहेत.


राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे आदेश निघताच जिल्ह्यांतर्गत प्रवासाला बंदी घालण्यात आली होती. परंतु महिनाभरापूर्वी पोलिसांच्या परवानगीने राज्यांतर्गत प्रवासाला अनुमती देण्यात आली. त्यानुसार नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबई, नवी मुंबईत स्थायिक असलेल्या मात्र लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबीयांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली.


शहरी भागातून गावाकडे धाव घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने तिथल्या स्थानिक यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. स्थलांतरितांना क्वारंटाइन करण्यासाठी जागेसह कोरोना चाचणीवर त्याचा परिणाम होत आहे. त्याशिवाय महामार्गांवरील रहदारीही वाढत आहे. त्यावर पर्याय म्हणून सात जिल्ह्यांनी नव्याने स्थलांतरितांना परवानगी न देण्याचे पोलिसांना कळवले आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनीदेखील या जिल्ह्यातील गावांकडे जाण्यासाठी येणारे ई-पासचे अर्ज नाकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, नाशिक तसेच कोल्हापूरचा समावेश आहे. तर दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात झाली असून, दिवसाला केवळ ५० परवानग्या दिल्या जात आहेत. मंजूर अर्जांपैकी बहुतांश अर्जदार हे कुटुंबासह गावी गेले आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून तीन लाखाहून अधिकांनी गाव गाठलेले आहे. तर लॉकडाउन सुरू असताना अथवा त्यापूर्वीच कोरोनाच्या भीतीने गाव गाठलेल्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर यासह कोकणातील काही जिल्ह्यांतील व्यक्तींचा समावेश आहे. शिवाय मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथून गावाकडे गेलेल्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी गाव गाठल्याने मागील दोन महिन्यांत संबंधित जिल्ह्यातील लोकसंख्येत भर पडली आहे. याचा परिणाम तिथल्या यंत्रणेवर होऊ लागल्याने नव्याने येणाºयांना जिल्ह्यात प्रवेशबंदी घातल्याचे दिसून येत आहे.


राज्यांतर्गत प्रवास अर्ज अधिक
च्मंजूर अर्जामध्ये नवी मुंबई आयुक्तालयांतर्गत देण्यात आलेल्या सुमारे पाच हजार
ई-पासचा समावेश आहे. उर्वरित अर्जांमध्ये काही प्रमाणात राज्याबाहेरील तर सर्वाधिक राज्यांतर्गत प्रवासाच्या अर्जांचा समावेश आहे.
राज्याच्या विविध भागांत जाण्यास लागणाºया पाससाठी नवी मुंबई पोलिसांकडे ३१ मेपर्यंत एकूण ५ लाख ३ हजार ८०७ अर्ज आले आहेत. त्यापैकी १ लाख ३६ हजार ८९९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विविध कारणांनी ३ लाख ६३ हजार ६०२ अर्ज नाकारण्यात आले असून, १ हजार ३०६ अर्जांची प्रक्रिया प्रलंबित आहे.
- प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा

Web Title: Migration has increased tensions in seven districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.