शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चा : युवा नेतृत्वाची नियोजनबद्ध आखणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 06:27 IST

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महामोर्चासाठी नवी मुंबई, पनवेल परिसरात ठिकठिकाणी स्वयंसेवक कार्यरत होते. यामध्ये तरुण स्वयंसेवकांमधील स्वयंशिस्त, नियोजनबद्ध आखणी, नेतृत्वगुण, एकजुटीचे दर्शन घडले.

प्राची सोनवणे नवी मुंबई : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महामोर्चासाठी नवी मुंबई, पनवेल परिसरात ठिकठिकाणी स्वयंसेवक कार्यरत होते. यामध्ये तरुण स्वयंसेवकांमधील स्वयंशिस्त, नियोजनबद्ध आखणी, नेतृत्वगुण, एकजुटीचे दर्शन घडले. रेल्वे स्थानक, उड्डाणपूल, महत्त्वाचे चौक, बस स्थानके आदी परिसरात स्वयंसेवकांनी विविध भूमिका बजाविल्याचे चित्र पाहायला मिळाले.विविध जिल्ह्यातून येणाºया मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये, तसेच मोर्चामध्ये नवी मुंबई, पनवेल परिसरातून सहभागी होणाºया बांधवांना कसल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी स्वयंसेवक कार्यरत होते. मोर्चातील सहभागी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मराठा मेडिको असोसिएशन, महानगरपालिका, डॉक्टर्स यांच्या वतीने रुग्णवाहिका सुविधा पुरविण्यात आल्या. मुंबईबाहेरून येणाºया नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी रेल मराठा स्वयंसेवक कार्यरत होते. काळ््या रंगाचे टी-शर्ट परिधान केलेल्या या स्वयंसेवकांनी लोकल प्रवास सुरळीत व्हावा याकरिता विशेष खबरदारी घेतली होती.शिक्षणासाठी आरक्षण नसल्याने मोठी कसरत करावी लागत असल्याची प्रतिक्रिया तरुणवर्गाकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळविताना आलेल्या अडचणींविषयी खंत व्यक्त करताना विद्यार्थिनी प्रियंका धुरी हिने नाराजी व्यक्त केली.परिस्थिती जेमतेम असतानाही फीमध्ये सवलत दिली जात नाही तर आरक्षित विद्यार्थ्यांना मात्र दुपटीने फीमध्ये सवलत मिळत असल्याने एक प्रकारे अन्याय होत असल्याचे प्रतिपादन धुरी हिने केले. सध्या नोकरी करत असलेल्या वैभव महानगरे आरक्षणाबाबत सरकार उदासीन असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.सरकारी नोकरीमध्ये आरक्षित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते तर आरक्षणाअभावी चांगले गुण मिळूनही हवी ती नोकरी करता येत नसल्याचे वैभवने स्पष्ट केले.महामार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्तमराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता नवी मुंबई पोलिसांनी पनवेल परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक जिल्ह्यातून मराठा समाजातील लोक मोर्चाकरिता बुधवारी मुंबईत आले होते. यात चारचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक होती. नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासूनच वाहतूक नियमनाकरिता पोलीस तैनात होते. पनवेल आणि कळंबोली वाहतूक शाखेकडून प्रभारी अधिकारी विजय कादबाने आणि गोरख पाटील यांच्यासह चार अधिकारी आणि १०६ कर्मचारी चोवीस तास महामार्गावर तैनात करण्यात आले होते. शेडुंग टोल नाका ते खारघर दरम्यान फौजफाटा सज्ज होता. स्थानिक पोलिसांच्या मदतीला मुख्यालय आणि इतर साईट ब्रँचची कुमक पाठविण्यात आली होती. दिशादर्शक आणि माहिती फलक लावले होते.सरकारी नोकºया, शिक्षण क्षेत्रात मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. शासनाच्या वतीने मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून न्याय दिला पाहिजे अशीच मागणी आहे.- आशिष बाबरहा ५८वा मोर्चा असून अजूनही शासनाला जाग आली नाही याची खंत वाटते. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. महिलांची सुरक्षा वाढवून कठोर कायदे लागू झाले पाहिजे. मोर्चातून एकजुटीचे दर्शन सरकारला नमते करेल.- साधना पवारइतर जातींप्रमाणेच मराठ्यांना देखील प्रत्येक क्षेत्रात आरक्षण मिळालेच पाहिजे आणि यासाठी आज नवी मुंबई, पनवेल परिसरातील मराठा बांधवांकडून मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला आहे.- शंकर वासमानेसरकारचे डोळे उघडण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून नवी मुंबई, पनवेलमध्ये स्वयंसेवक कार्यरत आहेत. वाहतूक व्यवस्था, पोलिसांवर ताण येऊ नये यासाठी स्वयंसेवक कार्यरत आहेत. - अर्जुन घाटगेमोर्चानंतर होणारा निर्णय हा सार्थकी लागावा असा हवा. तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या, अशीच आमची मागणी आहे. आतापर्यंतचे निर्णय दुटप्पी होते; मात्र ठोस निर्णयाची गरज आहे.- शशिकांत शेडगेमोफत प्रवासमोर्चात सहभागी होणाºया नागरिकांसाठी, मराठा बांधवांसाठी मोफत रिक्षा प्रवासाची सोय करण्यात आली होती. रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना या रिक्षाचा आधार घेता आला. खारघरमधील आकाश चंद्रकांत पाटील या तरुणाने हा उपक्रम राबविला होता. या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेल्या नागरिकांनाही या उपक्रमाचा लाभ घेता आला.