शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

मलावी चा टाॅमी अॅटकिन्स आंबा एपीएमसी मध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 10:07 PM

एपीएमसी मध्ये हा आंबा 300 रूपये प्रतिकिलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केट मध्ये  जवळपास 400 रूपये किलो दराने उपलब्ध होण्याची शक्यता आहे

नवी  मुंबई- दक्षिण पूर्व अफ्रिकेतील मलावी देशातील हापूस नंतर टाॅमी अॅटकिन्स आंबा ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दाखल झाला आहे.  22 टन आवक झाली असून अजून 44 टन आवक लवकरच होणार आहे.  एपीएमसी मध्ये हा आंबा 300 रूपये प्रतिकिलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केट मध्ये  जवळपास 400 रूपये किलो दराने उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

 पावसाळा लांबल्यामुळे  कोकणातील हापूस आंब्याला उशीरा मोहोर लागत आहे. ग्राहकांना हापूस ची चव चाखण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे.  या कालावधीत विदेशातील आंबा विक्रीसाठी भारतात येऊ लागला आहे.  नोव्हेंबर मध्ये मलावी देशातील हापूस आंबा विक्रीसाठी आला होता.  शनिवारी तेथील टाॅमी अॅटकिन्स आंबा एपीएमसी मध्ये दाखल झाला आहे. समुद्र मार्गे  तीन कंटेनर मधून 66 टन आंबा मागविला असून शनिवारी पहिला  कंटेनर मार्केट मध्ये पोहचला.  4 किलो वजनाचे  5500 बाॅक्स आले आहेत. 300 रूपये किलो विक्री होत आहे.     ग्राहकांकडून ही मलावी मधील हापूस आंब्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

टॅग्स :MangoआंबाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई