मलनि:सारणचा कचरा मोकळ्या भूखंडावर; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:34 IST2019-01-03T00:34:16+5:302019-01-03T00:34:26+5:30
कोपरखैरणेमधील महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राला समस्यांचा विळखा पडला आहे. येथील संरक्षण कुंपण नादुरुस्त झाल्यामुळे या परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे.

मलनि:सारणचा कचरा मोकळ्या भूखंडावर; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
नवी मुंबई : कोपरखैरणेमधील महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राला समस्यांचा विळखा पडला आहे. येथील संरक्षण कुंपण नादुरुस्त झाल्यामुळे या परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. केंद्रामधील कचरा ठेकेदार येथील मोकळ्या भूखंडावर टाकत असल्याचे निदर्शनास आले असून, प्रशासन याकडे दुर्लक्ष करू लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरामध्ये अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र उभारली असून, प्रमुख केंद्रामध्ये कोपरखैरणेचाही समावेश आहे. येथे प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडून दिले जात आहे. दोन दिवस केंद्रामध्ये बिघाड झाल्यामुळे प्रक्रिया न करताच पाणी खाडीत सोडून द्यावे लागले. रविवार व सोमवार दोन्ही दिवस पाण्यावर प्रक्रिया केली नाही, याविषयी नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रत्यक्ष केंद्रामध्ये जाऊन पाहणी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. केंद्रामध्ये येणाऱ्या व जाणाºया नागरिकांची कोणतीही नोंद ठेवण्यात येत नाही. प्रशासनाने केंद्राच्या दोन्ही बाजूला संरक्षण कुंपण म्हणून पत्र्याचे शेड तयार केले होते. कुंपणाचे पत्रे चोरीला गेले आहेत, उर्वरित गंजले आहेत. कुंपणासाठीचे लोखंडही गायब झाले आहे. प्रशासनाने कुंपणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी असणाºया मोकळ्या जागेवर अमली पदार्थांचे सेवन करणाºयांनी अड्डा तयार केला आहे. मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन तरुण येथे दिवसभर बसलेले असतात. मलनि:सारण केंद्रामधील पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर शिल्लक राहिलेला स्लज क्षेपणभूमीवर टाकणे आवश्यक आहे; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार हा स्लज मोकळ्या भूखंडावर टाकत आहे. पालिकेची कोणतीही परवानगी न घेतला सर्व कचरा बिनधास्तपणे येथे टाकला जात असून, पालिकेचे कर्मचारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ठेकेदाराच्या कामावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
दोन दिवसांपासून मलनि:सारण केंद्रातील पाणी प्रक्रिया न करताच सोडल्याविषयी माहिती घेण्यासाठी अभियांत्रिकी विभागाशी संपर्क साधला असता, दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे पाणी काही वेळ खाडीत सोडून द्यावे लागले होते; परंतु सद्यस्थितीमध्ये दुरुस्ती पूर्ण झाली असून, पूर्ववत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ठेकेदार शेजारील भूखंडावर कचरा टाकत असल्याबद्दल विचारणा केली असता, अधिकाºयांनाच त्याची माहिती नव्हती.
कचरा क्षेपणभूमीवर टाकला जात असल्याचे सांगण्यात आले. यामुळे पालिकेच्या अधिकाºयांचे येथील कामावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
विनाविलंब कुंपण बसवावे
मलनि:सारण केंद्राच्या आवारामध्ये विनापरवाना कोणीही येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी चारही बाजूला संरक्षण भिंत किंवा पत्र्याचे शेड टाकून कुंपण घालणे आवश्यक आहे. यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधींनीही वारंवार मागणी केली असून, पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.