शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 19:52 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काल भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ऐरोलीतून गणेश नाईक यांची उमेदवारी जाहीर केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आता उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली, काल भाजपाने पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत ऐरोलीतून गणेश नाईक यांना उमेदवारी दिली, तर बेलापूर विधानसभेतून आमदार मंदा म्हात्रे यांचे नाव आहे. बेलापूरमधून गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी उमेदवारीची मागणी केली होती. दरम्यान, आता संदीप नाईक बंडखोरी करणार असल्याचे बोलले जात आहे. 

संदीप नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पोस्टर सोशल मीडियावर  व्हायरल झाले आहेत. यामुळे आता ते बंडखोरी करुन निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता संदीप नाईक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...

दरम्यान, भाजपाच्या गणेश नाईक यांनी आज प्रचाराला सुरुवात केली. आज त्यांनी संदीप नाईक यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली . गणेश नाईक म्हणाले, लोकशाही आपण कोणाचा आवाज दाबू शकत नाही. एखाद्या कार्यकर्त्याला वाटलं तर त्याने ते बोलून काही चूक केली असं मला वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. मला दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. माझ्यावर वरिष्ठ नेत्यांनी विश्वास ठेवला. 

"मी संदीप नाईक यांचा वडील आहे, पक्षाच्या निरिक्षकांनी मतदारसंघातील वातावरण बघून निर्णय घेतला असे. संदीप नाईक त्या कॅलिबरचे नाहीत असं वाटलं असेल आणि पक्षाला जे वाटलं असेल ते बरोबर असं आपण म्हणायला पाहिजे, असंही गणेश नाईक म्हणाले. संदीप नाईक यांनी पक्षाच्या शिस्तसोबत चालले पाहिजे. पण त्यांना जर त्यांच्यात लढण्याचा उत्साह असेल तर मी थांबवणार नाही,मी त्यांना पक्षासोबत थांबून काम केलं पाहिजे असंच सांगेन, असंही गणेश नाईक म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ganesh Naikगणेश नाईकElectionनिवडणूक 2024NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा