Maharashtra Election 2019: Polling drops in Panvel, Navi Mumbai | पनवेल, नवी मुंबईत मतदानाचा टक्का घसरला

पनवेल, नवी मुंबईत मतदानाचा टक्का घसरला

नवी मुंबई : नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये अपेक्षित मतदान झाले नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये दिघा, तुर्भे परिसरामध्ये ७ वाजताच मोठ्या रांगा लागल्याचे चिन्ह पाहावयास मिळायचे. यावर्षी रांगा कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पहिल्या दोन तासांमध्ये फक्त चार टक्के मतदानाची नोंद झाली होती.

मतदानाचा टक्का घसरत आल्याचे लक्षात येताच सर्वपक्षीय उमेदवार व कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवरून मतदानाचे आवाहन करण्यास सुरुवात केली होती. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. दुपारनंतर मतदानाचा टक्का काही प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. बेलापूरमध्ये २०१४ च्या निवडणुकीमध्ये ४९.६६ टक्के मतदान झाले होते. या वेळी मतदानाचा टक्का घसरून ४५.३५ टक्के झाला आहे. ऐरोलीमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. मागील निवडणुकीमध्ये ५७.४७ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये घसरण होऊन ४२. ८९ टक्क्यांवर आली आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये शांततेमध्ये मतदान झाले आहे.

पनवेल मतदारसंघामध्येही अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याचे पाहावयास मिळाले. या पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ६६.७५ टक्के मतदान झाले होते. यावर्षी यामध्ये जवळपास १२ टक्क्यांची घसरण होऊन ५४.२९ टक्क्यांवर आली आहे. उरणमध्ये मात्र मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना व भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये याठिकाणी चुरस होती. याचा परिणाम मतदानावरही झालेला पाहावयास मिळाला. तब्बल ७३.२३ टक्के मतदान झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधील चार मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदान उरणमध्ये झाले आहे.

मतदानादरम्यान महत्त्वाच्या घडामोडी

ऐरोली मतदारसंघामधील दत्ता मेघे अभियांत्रिकी विद्यालयामध्ये मतदानासाठी गेलेल्या सावित्री बाणखेले या महिलेने मतदान केले; पण कर्मचाऱ्यांनी बोटाला शाहीच लावली नसल्याचे निदर्शनास आले.ऐरोलीमधील विलास पाटील या मतदाराकडे आधार कार्ड व पॅन कार्ड असतानाही त्यांना मतदान करू दिले जात नव्हते. अखेर त्यांनी बँकेचे पासबुक दाखविल्यानंतर मतदान करू देण्यात आले. घणसोलीमधील एका मतदान केंद्रावर नागरिक व पोलिसांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली.

कोपरखैरणेमधील ज्ञानविकास शाळेमध्ये मतदानासाठी आलेल्या नागरिकांना मतदारयादीमध्ये नावेच नसल्याचे लक्षात आले, यामुळे अनेकांना नाराज होऊन परत जावे लागले. कोपरखैरणे सेक्टर १२ मधील शहा कुटुंबीयांच्या नावापुढे चुकीचे फोटो लागले होते. यामुळे गोंधळ झाला होता.
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईसह पनवेलमध्ये मतदानाचा टक्का घसरला आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये सर्वात कमी ४२.८९ टक्के मतदान झाले असून, बेलापूरमध्ये ४५.३५ टक्के मतदान झाले आहे. पनवेलमध्ये २०१४ मध्ये ६७.७५ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये घसरण होऊन ५४.२९ टक्क्यांवर आले आहे. चाकरमानी गावाकडे गेल्याचा परिणाम येथील मतदानावर झाला आहे. उरणमध्ये विक्रमी ७३.२३ टक्के मतदान झाले आहे.

घणसोलीमध्ये विद्युत पुरवठा बंद

घणसोलीमधील २०९ ते २२१ मतदान केंद्र असलेल्या शाळेमधील विद्युत पुरवठा दीड तास खंडित झाला. यामुळे मतदान प्रक्रियेचा खोळंबा झाला. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आवाहन केले होते.

घणसोलीमध्ये विद्युत पुरवठा बंद

घणसोलीमधील २०९ ते २२१ मतदान केंद्र असलेल्या शाळेमधील विद्युत पुरवठा दीड तास खंडित झाला. यामुळे मतदान प्रक्रियेचा खोळंबा झाला. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आवाहन केले होते.९तुर्भे शिवसेना शाखेत

तोडफोड

1तुर्भे स्टोअर येथील शिवसेना शाखेत तोडफोड झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. मात्र, आपसातील वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
2शहरात विधानसभा निवडणुकीची रंगत चढत असतानाच सोमवारी मतदानाच्या दिवशी सकाळी हा प्रकार उघड झाला. सोमवारी सकाळी काही शिवसैनिक तुर्भे शाखेकडे गेले असता, टेबल, खुर्ची तसेच टीव्ही फुटल्याचे आढळून आले. या प्रकरणी चौकशीदरम्यान रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी काही कार्यकर्ते बसलेले होते. त्यांच्यात आपसात वाद झाला असता धक्काबुक्कीमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही.

शहरी भागात निरुत्साह

मराष्ट्रातील सर्वात मोठ्या पनवेल विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान शांततेत पार पडले. कोठेही कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. मात्र, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. या मतदारसंघात ५४.२९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
च्सकाळी ७ वाजता विविध मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली.

तळोजा या ठिकाणी मतदान केंद्र क्रमांक ३५ या ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने मशिन बंद पडली. १५ मिनिटांत नवी मशिन या केंद्रात बसविण्यात आली. या वेळी मतदारांना केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागले. मतदान केंद्रांवर दिव्यांगांना मतदान करण्यास व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच राजकीय पक्षाच्या वतीनेही मतदारांना मतदान केंद्रावर सोडण्यासाठी खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर व शेकापचे उमेदवार हरेश केणी यांनी सपत्नीक मतदान केले. यांच्याव्यतिरिक्त आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदीसह तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी मतदान केले.च्मतदान केंद्रावर सेल्फीचा नवा ट्रेंड नव्याने तरुणवर्गामध्ये पाहावयास मिळाला. यासाठी मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंट उभारले होते.

नवी मुंबई क्षेत्रातील उरण मतदारसंघात सर्वाधिक मतदान

उरण मतदारसंघात ३२७ मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केल्याने उत्साहाचे वातावरण होते.
च्उरण मतदारसंघात सेना-भाजप महायुतीचे उमेदवार मनोहर भोईर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप महाआघाडीचे उमेदवार विवेक पाटील यांच्यासह एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदान सुरू होण्यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या पोलिंग एजंटने मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. उरणमधील ग्रामीण व शहरी मतदान केंद्रावर दिवसभर गर्दी होती.

मतदानासाठी सरकारने सुट्टी जाहीर केली असली तरी बºयाच खासगी कंपन्यांनी कामगारांना सुट्टी जाहीर केली नव्हती. त्यामुळे घाईघाईने मतदान करून कामावर जाणाºया खासगी कंपनीच्या कामगारांची संख्या सर्वाधिक होती. ७ ते ९ आणि १० ते १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी होती.
च्विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे एजंट मतदारांना रिक्षा, दुचाकीवरून मतदान केंद्रावर सोडत होते, त्यामुळे मतदान केंद्राबाहेर एजंट, मतदार आणि वाहनांची गर्दी झाली होती.

१२ ते ३ वाजेपर्यंत बहुतांश मतदान केंद्रांवर ऊन आणि जेवणाची वेळ असल्याने मतदारांची गर्दी ओसरली होती. तर काही मतदान केंद्रावर तुरळक आणि संथगतीने मतदान सुरू होते. दुपारी ३ वाजल्यापासून मतदान केंद्रावर पुन्हा गर्दी पाहायला मिळाली. त्याचबरोबर मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणि मतदान केल्यानंतर पुन्हा घरापर्यंत पोहोचण्यासाठी एजंट धावाधाव करताना दिसत होते. दरम्यान, संध्याकाळी ६ पर्यंत विविध मतदार केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.

Web Title: Maharashtra Election 2019: Polling drops in Panvel, Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.