Maharashtra Election 2019: मतदानासाठी २१ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 00:14 IST2019-10-17T23:59:51+5:302019-10-18T00:14:52+5:30
Maharashtra Election 2019: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी खासगी कारखाने, आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कामगार यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी शासनाने जाहीर केलेली आहे.

Maharashtra Election 2019: मतदानासाठी २१ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी
अलिबाग : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी खासगी कारखाने, आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कामगार यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी शासनाने जाहीर केलेली आहे.
यामध्ये जिल्ह्यातील कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृह, नाट्यगृहे, व्यापार, मॉल्स अन्य आस्थापनांमध्ये काम करणाºया कामगार, कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास अशा व्यवस्थापनाने कामगार, कर्मचाºयांना दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. त्यासाठी आस्थापना, कारखाना मालकाने जिल्हा निवडणूक अधिकाºयांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे, असे कामगार उपायुक्त रायगड प्र. ना. पवार यांनी सांगितले.