वाढीव मालमत्ता काराविरोधात तालूका प्रकल्पग्रस्त समितीचे महाधरणे आंदोलन
By वैभव गायकर | Updated: January 30, 2024 12:09 IST2024-01-30T12:09:29+5:302024-01-30T12:09:37+5:30
यावेळी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील देखील या मोर्चात सहभागी झाले.

वाढीव मालमत्ता काराविरोधात तालूका प्रकल्पग्रस्त समितीचे महाधरणे आंदोलन
पनवेल: पनवेल महानगरपालिकेमार्फत जाचक आणि वाढीव मालमत्ता काराविरोधात पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून दि.30 रोजी महाधरणे आंदोलन पुकारत पालिकेमार्फत लादला जाणारा वाढीव मालमत्ता कर कमी करण्याची मागणी करण्यात आली.
उद्योजकांचे 268 कोटी माफ केले जात असतील तर सर्व सामान्य नागरिकांना वेगळा न्याय का ? असा सवाल उपस्थित करीत पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.या मोर्चात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावातील ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी पार्किंग आणि पॅसेज मधील कर रद्द करा,पालिकेचा झिजिया रद्द करा आदी प्रकारचे फलक झळकविण्यात आले. यावेळी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील देखील या मोर्चात सहभागी झाले. यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाला निवेदन देखील सादर केले.
नवी मुंबई: पनवेल महानगरपालिकेवर टॅक्सच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या मोर्च्यात सहभाग घेतला. pic.twitter.com/oQx5b8HCPC
— Lokmat (@lokmat) January 30, 2024