- कमलाकर कांबळेनवी मुंबई - नवी मुंबईतील घरांना ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विविध ऑफर्सच्या माध्यमातून विक्री वाढवण्यासाठी आता विकासकांचे लक्ष अक्षय्य तृतीयेकडे लागले आहे. विकासकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अडकली असून, शिल्लक घरे विकण्यासाठी विकासकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
सिडकोच्या मास हाैसिंग योजनेमुळे खासगी प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे. परवडणाऱ्या दरात घरे, पारदर्शक प्रक्रिया आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्धता यामुळे ग्राहक सिडकोकडे वळले आहेत. त्याचबरोबर व्याजदरातील चढ-उतार, रोजगाराची अनिश्चितता आणि गुंतवणुकीवरील परतावा यासारख्या कारणांमुळे ग्राहक आता घर खरेदीबाबत अधिक सावध वविचारपूर्वक निर्णय घेत आहेत. त्यामुळे बाजारातील मागणी घटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नवी मुंबईत घरांची मागणी तितकी वाढलेली नाही. सिडकोच्या परवडणाऱ्या योजनांमुळे खासगी प्रकल्पांना स्पर्धा निर्माण झाली आहे. ग्राहक आता किंमत, लोकेशन आणि सुविधांचा सखोल विचार करूनच निर्णय घेत आहेत, असे बांधकाम व्यावसायिक दत्ता पोळ यांनी सांगितले.
आकर्षक योजना जाहीरविक्री वाढवण्यासाठी विकासकांकडून आकर्षक योजना जाहीर केल्या जात आहेत. त्यात ‘नो जीएसटी’, ‘स्टॅम्प ड्यूटी फ्री’, फर्निश्ड फ्लॅट्स, कमी डाउनपेमेंट, त्वरित ताबा योजनेचा समावेश आहे. याशिवाय, रेडिरेकनरचे दर स्थिर ठेवल्याचा फायदा घेऊन घरांच्या किमती कमी झाल्याचा जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, अक्षय तृतीयेवर विकासकांनी मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत.
या भागांत कमी विक्रीखारघर : सेक्टर ३० ते ३५ - नव्या टाउनशिपमध्ये मोठा साठातळोजा (पेंधर) : सेक्टर १० ते २० - परवडणाऱ्या घरांची भरपूर उपलब्धताउलवे : सेक्टर १७, १९, २३ - विक्री मंदावलेली द्रोणागिरी : अपूर्ण प्रकल्पांमुळे मागणीत घट घणसोली : उच्च दरांमुळे ग्राहकांचा कमी प्रतिसादकळंबोली (रोडपाली) : तयार फ्लॅट्स विक्रीविना
Web Summary : Navi Mumbai housing faces slow demand due to CIDCO schemes. Developers focus on Akshaya Tritiya with offers to unlock investments. High prices and location concerns also affect sales.
Web Summary : सिडको योजनाओं के कारण नवी मुंबई में घरों की मांग धीमी है। डेवलपर्स निवेश को अनलॉक करने के लिए अक्षय तृतीया पर ऑफ़र के साथ ध्यान केंद्रित कर रहे हैं। उच्च मूल्य और स्थान संबंधी चिंताएं भी बिक्री को प्रभावित करती हैं।