शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महानगरपालिकेच्या जलवाहिनीला नेरेपाडा येथे गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 23:26 IST

पनवेल महापालिकेच्या जलवाहिनीला नेरेपाडा येथे गळती लागली असून एअर वॉलमधून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. पनवेल महापालिकेची जलवाहिनी गाढेश्वर धरणापासून पनवेल शहरातून गेली आहे.

पनवेल : पनवेल महापालिकेच्या जलवाहिनीला नेरेपाडा येथे गळती लागली असून एअर वॉलमधून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे.पनवेल महापालिकेची जलवाहिनी गाढेश्वर धरणापासून पनवेल शहरातून गेली आहे. या जलवाहिनीला ठिकठिकाणी एअर वॉल बसवण्यात आले आहेत. वॉलमधून गुरुवार, 3० जानेवारी रोजी लाखो लीटर पाणी वाया गेले. यापूर्वीदेखील वॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. त्या वेळी वॉल दुरुस्त करण्याऐवजी लाकडाची खुंटी मारण्यात आली होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या निष्काळजीमुळे गुरुवारी खुंटी उडाली. वॉलमधून लाखो लीटर पाणी शेतामध्ये व रस्त्याच्या कडेला वाहून गेले. सकाळी आठच्या सुमारास ही खुंटी उडाली व वॉलमधून उंचच उंच पाण्याचे फवारे पंधरा ते वीस फुटापर्यंत उडत होते. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले.पाण्याच्या आवाजामुळे शेजारील नागरिक घाबरतच बाहेर आले. या वेळी रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. तर दुसरीकडे शेतात पाणी गेल्याने पूर्ण शेत जलमय झाले होते. एकीकडे महापालिका पनवेलमध्ये पाणी वाचविण्याचे संदेश देते, मात्र ज्या ठिकाणी एअर वॉल आहे त्या ठिकाणी लाकडाची खुंटी मारून दुरुस्तीकामात चालढकल केली जात असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई