पनवेल महानगरपालिकेच्या जलवाहिनीला नेरेपाडा येथे गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 23:26 IST2020-01-30T23:26:02+5:302020-01-30T23:26:24+5:30
पनवेल महापालिकेच्या जलवाहिनीला नेरेपाडा येथे गळती लागली असून एअर वॉलमधून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. पनवेल महापालिकेची जलवाहिनी गाढेश्वर धरणापासून पनवेल शहरातून गेली आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या जलवाहिनीला नेरेपाडा येथे गळती
पनवेल : पनवेल महापालिकेच्या जलवाहिनीला नेरेपाडा येथे गळती लागली असून एअर वॉलमधून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे.
पनवेल महापालिकेची जलवाहिनी गाढेश्वर धरणापासून पनवेल शहरातून गेली आहे. या जलवाहिनीला ठिकठिकाणी एअर वॉल बसवण्यात आले आहेत. वॉलमधून गुरुवार, 3० जानेवारी रोजी लाखो लीटर पाणी वाया गेले. यापूर्वीदेखील वॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. त्या वेळी वॉल दुरुस्त करण्याऐवजी लाकडाची खुंटी मारण्यात आली होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या निष्काळजीमुळे गुरुवारी खुंटी उडाली. वॉलमधून लाखो लीटर पाणी शेतामध्ये व रस्त्याच्या कडेला वाहून गेले. सकाळी आठच्या सुमारास ही खुंटी उडाली व वॉलमधून उंचच उंच पाण्याचे फवारे पंधरा ते वीस फुटापर्यंत उडत होते. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले.
पाण्याच्या आवाजामुळे शेजारील नागरिक घाबरतच बाहेर आले. या वेळी रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. तर दुसरीकडे शेतात पाणी गेल्याने पूर्ण शेत जलमय झाले होते. एकीकडे महापालिका पनवेलमध्ये पाणी वाचविण्याचे संदेश देते, मात्र ज्या ठिकाणी एअर वॉल आहे त्या ठिकाणी लाकडाची खुंटी मारून दुरुस्तीकामात चालढकल केली जात असल्याचे दिसून येत आहे.