एकविरा मंदिरच्या रोडवर अचानक कारला आग लागल्याने मोठी वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 15:04 IST2019-10-28T13:03:58+5:302019-10-28T15:04:18+5:30
दिवाळीनिमित्त लोणावळ्यातील एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज (सोमवारी) मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

एकविरा मंदिरच्या रोडवर अचानक कारला आग लागल्याने मोठी वाहतूक कोंडी
नवी मुंबई: दिवाळीनिमित्त लोणावळ्यातील एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज (सोमवारी) मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यातच डोंगराच्या पायथ्याशी दुपारी 12 वाजता रोडवरील कारला अचानक आग लागून कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभारातून भावीक आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मंदीराकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी झाली होती. त्यातच रोडवरील एका कारमधून अचानक धूर येऊ लागल्याने गाडीमधील भावीत तात्काळ गाडीतून बाहेर पडले. यानंतर काही क्षणातच संपूर्ण कारने पेट घेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. तसेच या घटनेमुळे मंदीराजवळील रोडवरील वाहतूक ठप्प झाल्याने घरी परतणारे भावीक घाटतचं अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.