शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

खारघर हिल पर्यटकांसाठी बंद; सिडकोचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:31 PM

पावसाळ्यात सतर्कता म्हणून कार्यवाही

पनवेल : पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी सिडको प्रशासनाने १५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडीवर पर्यटकांसाठी प्रवेश बंद केला आहे. मात्र टेकडीवरील चाफेवाडी, फणसवाडी येथील गावकऱ्यांना यामधून सूट असणार आहे. सिडकोच्या खारघर येथील कार्यालयातून यासंदर्भात खारघर पोलिसांना पत्र देण्यात आले आहे.नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर टेकडी हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून संपूर्ण नवी मुंबई शहराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. सिडकोने याठिकाणी जाण्यासाठी डांबरी रस्ता, पथदिवे बसविले आहेत. शहरामधील अनेक नागरिक या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला येतात. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच सिडकोने या ठिकाणी १५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने याठिकाणी सहा सुरक्षारक्षकही नेमले आहेत. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक सुरक्षारक्षकांना न जुमानता टेकडीवर जातात.अशा पर्यटकांना रोखण्यासाठी सिडकोच्या वतीने खारघर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार खारघर पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी पोलीस नियुक्त करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.शनिवारी, रविवारी खारघर टेकडीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच दरवर्षीप्रमाणे यंदाही टेकडीवरील प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी त्याचे पालन करावे.- संजय पुदाळे, सिडको अधिकारी, खारघर विभाग