शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खैरवाडी दोन दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: November 10, 2016 03:44 IST

पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील विजेचे पोल कोसळल्यामुळे दोन दिवसांपासून आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागत आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील विजेचे पोल कोसळल्यामुळे दोन दिवसांपासून आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. दोन दिवस उलटून गेले तरी देखील महावितरणने येथील विजेचे पोल बसविले नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत.पनवेलपासून जवळपास १० किलोमीटरवर वसलेल्या खैरवाडी आदिवासी वाडीत ४० ते ४५ घरांची वस्ती आहे. २५० आदिवासी बांधव येथे राहतात. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास विजेचा पोल खाली पडल्याने येथील वीज गायब झाली व येथील रहिवाशांना अंधारात राहावे लागले. दोन दिवसांपासून येथील वीज गायब झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज नसल्यामुळे अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे मच्छरांचा त्रास होत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. पोल पडल्यामुळे येथील वीज पुरवठा चालूच होता. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी घडली नाही. गंज लागल्यामुळे येथील अनेक पोल पाडण्याच्या स्थितीत आहेत. मात्र महावितरण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला.ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीज यंत्रणा जुनाट झाली आहे. काही ठिकाणच्या विजेच्या खांबांना वेलींनी आलिंगन घातले आहे. तर बहुतांश ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळताना दिसत आहेत. विजेच्या तारा तुटणे, खांब पडणे यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणचा भोंगळ कारभार पहावयास मिळत आहे. बहुतांश भागातील डीपींना झाकणे नाहीत तर काही डीपी दिवस-रात्र उघड्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात घडू शकतो. विजेच्या खांबांमध्ये असलेले जास्त अंतर यामुळे काही ठिकाणी तारा लोंबकळल्या आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन जीर्ण विद्युत तारा व विजेचे खांब तत्काळ बदलावेत अशी येथील जनतेची मागणी आहे. याबाबत कनिष्ठ अभियंता जी.एस.सूर्यवंशी यांना विचारले असता शनिवारपर्यंत वीज येईल असे सांगण्यात आले. (वार्ताहर)