कशेडी घाटात कारची एसटीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2015 01:51 IST2015-09-02T01:51:35+5:302015-09-02T01:51:35+5:30
मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कारची एसटी बसला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले तर एका लहान मुलाचा

कशेडी घाटात कारची एसटीला धडक
पोलादपूर : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कारची एसटी बसला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले तर एका लहान मुलाचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भोगाव हद्दीत घडला.
बस चालक दिलीप शंकरराव जोंधळे (४०) हा आपल्या ताब्यातील एसटी बस क्र. एमएच २० बीएल ३३४२ घेवून मुंबई ते चिपळूण असा कशेडी घाटातून भोगाव गावच्या हद्दीतून जात असता त्याच दरम्यान राजापूरहून अंधेरी मुंबईकडे जात असलेली कार क्र. एमएच ०५ सीअे ४५३८ या कार चालकाचा अवघड वळणावर ताबा सुटला. त्यामुळे कार चुकीच्या बाजूने एसटीला जोरदार धडकली. या अपघातात कारमधील प्रकाश गुरव (५०), कैलास गुरव (४०) हे दोघे किरकोळ जखमी झाले तर ओम कैलास गुरव (८) हा लहान मुलगा गंभीर जखमी झाला. हे सर्व अंधेरी येथील रहिवासी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच कशेडी टॅप, महामार्ग पोलिसांनी जगतगुरु स्वामी नरेंद्र महाराज ट्रस्टच्या रुग्णवाहिकेस पाचारण केले. जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.