नवी मुंबईत प्रदूषणात कळंबाेली आघाडीवर; पनवेल, उरणच्या आकाशात धूलिकण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 06:53 IST2024-12-27T06:52:34+5:302024-12-27T06:53:19+5:30

गुरुवारी शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १२८ वर

Kalamboli leads in pollution in Navi Mumbai Dust levels increase in Panvel Uran | नवी मुंबईत प्रदूषणात कळंबाेली आघाडीवर; पनवेल, उरणच्या आकाशात धूलिकण वाढले

नवी मुंबईत प्रदूषणात कळंबाेली आघाडीवर; पनवेल, उरणच्या आकाशात धूलिकण वाढले

नवी मुंबई : थंडीचे प्रमाण वाढल्यापासून नवी मुंबई, पनवेल, उरणच्या आकाशात धूलिकणांचे प्रमाणही वाढले आहे. गुरुवारी शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १२८ वर, तर कळंबोलीमध्ये हेच प्रमाण १५२ वर होते. 

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये धूलीकणांबरोबर कारखान्यांमधील उग्रवासामुळेही श्वास घेण्यास त्रास होत आहे. तळोजा परिसरामध्येही प्रदूषण वाढत आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम, सायन-पनवेल व जेएनपीटी महामार्ग, अंतर्गत रस्ते, शेकडो इमारतींचे बांधकामासह दगडखाणींमुळे प्रदूषण वाढत आहे.

प्रदूषणाची कारणे

ठाणे बेलापूर व तळोजा एमआयडीसीतील कारखान्यांच्या धुरामुळे हवेत धूलिकण वाढत आहेत.

उरण, पनवेल परिसरातील दगडखाणींसह मिक्सर प्लँटमुळेही प्रदूषणात वाढ.

सायन-पनवेल महामार्ग, जेएनपीटी महामार्ग, तळोजा व पनवेलमधील रस्त्यांवरील धूळ 

नवीन इमारतींच्या कामामुळेही प्रदूषणात वाढ. 

नवी मुंबई विमानतळाचे काम  व परिसरात होणाऱ्या विकासकामेही धूलिकणात भर घालत आहेत.

कारखाने, बांधकाम व्यावसायिक व ज्यांच्यामुळे प्रदूषण पसरत आहे असे लक्षात आले की त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येते. सर्वांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या असून, आवश्यक त्या उपाययाेजना करण्यात येत आहेत - जयंत कदम, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

Web Title: Kalamboli leads in pollution in Navi Mumbai Dust levels increase in Panvel Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.