शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी जयवंत सुतार, उपमहापौरपदी मंदाकिनी म्हात्रे यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 5:09 PM

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत सुतार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. तर, उपमहापौरपदी कॉंग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांची निवड झाली आहे.

ठळक मुद्देमहापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत सुतार यांची बाजी शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ वास्कर यांचा केला पराभव उपमहापौरपदी कॉंग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांची निवड

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत सुतार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. तर, उपमहापौरपदी कॉंग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांची निवड झाली आहे.जयवंत सुतार यांना एकूण 67 मते मिळाली, तर सोमनाथ वास्कर यांना 38 मते मिळाली. या निवडणुकीवेळी भाजपाच्या सहा नगरसेवकांनी हजेरी लावली नाही. तर, अपक्षांसह काँग्रेसची मते राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मंदाकिनी म्हात्रे यांना 64 मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार द्वारकानाथ भोईर यांना 38 मते मिळाली. तसेच, कॉंग्रेसच्या बंडखोर उमेदवार वैजयंती भगत यांना फक्त तीन मते पडली.प्रत्यक्ष मतदानादिवशी मते फुटू नयेत यासाठी सर्वपक्षीयांनी नगरसेवकांना व्हिप जारी करण्यात आले होते. राष्ट्रवादीकडून महापौरपद हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. परंतु ऐनवेळी भाजपाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने विजय चौगुले यांनी माघार घेतली व निवडणुकीमधील चुरस जवळपास संपुष्टात आली. मात्र, काँग्रेसमध्ये उपमहापौर पदावरून मतभेद सुरु होते.नवी मुंबई महानगरपालिकेचे 13 वे महापौर म्हणून जयवंत सुतार विराजमान होणार आहेत. तसेच, त्यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक यांचे विश्वासू सहकारी म्हणून पाहिले जाते. त्यांनी 1995 पासून चारवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडणून गेले आहेत. याचबरोबर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापतीपद भूषविले आहे.मंदाकिनी म्हात्रे या 2014 मध्ये प्रथमच महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या त्या पत्नी आहेत. रमाकांत म्हात्रे यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका