शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

रेल्वेचा अपघात घडवण्याचा प्रयत्न, ट्रॅकमध्ये अडकवला लोखंडी रॉड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 6:59 AM

जुईनगरमधील प्रकार । ट्रॅकमध्ये अडकवला लोखंडी रॉड

नवी मुंबई : हार्बर मार्गावरील लोकलचा अपघात घडवण्याचा प्रयत्न झाल्याची बाब जुईनगर येथे उघडकीस आली. रेल्वेचा ट्रॅक बदलण्याच्या ठिकाणच्या दोन रुळामध्ये अज्ञाताने लोखंडी रॉड अडकवला होता. यामुळे सिग्नल पडत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून झालेल्या पाहणीत हा प्रकार उघड झाला.

हार्बर मार्गावर पनवेलकडे जाणाºया रेल्वेमार्गावर जुईनगर रेल्वेस्थानकालगत हा प्रकार घडला. जुईनगर स्थानकातून पनवेलच्या दिशेने जाणाºया लोकलला ट्रॅक बदलण्याच्या ठिकाणी सिग्नल मिळत नव्हता. यामुळे पनवेलकडे जाणाºया लोकल एकापाठोपाठ एक थांबविण्यात आल्या होत्या. या वेळी रेल्वेच्या कामगारांनी सदर परिसरातील रुळाची पाहणी केली असता, ट्रॅक बदलण्याच्या ठिकाणी दोन रुळामध्ये रॉड अडकवलेला असल्याचे दिसून आले. त्यामुळे रुळ एकमेकांना जुळत नसल्याने सिग्नल मिळण्यात अडथळा निर्माण झाला होता. तर पुढे जाण्यासाठी सिग्नल मिळत नसल्याने लोकल थांबवण्यात आल्या होत्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर रुळात अकडकवलेला रॉड काढून लोकलच्या मार्गातील अडथळा दूर करण्यात आला. सदर प्रकार लोकलचा अपघात घडवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक केला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे लोकलची संभाव्य दुर्घटना टळली आहे. जुईनगर रेल्वेस्थानक परिसरात रात्री गर्दुल्ल्यांचा वावर असतो. त्यांच्याकडूनच हा प्रकार केला गेल्याचीही शक्यता आहे. सदर घटनेची नोंद रेल्वे पोलिसांकडे करण्यात आली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेNavi Mumbaiनवी मुंबई