शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

उघड्यावर मालवाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 05:27 IST

शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे. मात्र उघड्या डम्परमधून सर्रास वाहतूक होत असतानाही त्यावर कारवाईकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.सायन-पनवेल मार्गावर मागील काही दिवसांपासून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची भर पडली आहे. या वाहनांमधून उलवे अथवा लगतच्या परिसरातून मुंबईच्या दिशेने दगड, खडी, माती, वाळू तसेच विटा नेल्या जातात. मात्र बांधकामासाठी लागणाºया या मालाची वाहतूक करताना संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. यामुळे सायन- पनवेल मार्गावर अपघातांना निमंत्रण मिळत असून जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. त्यात सर्वाधिक धोका दुचाकीस्वारांना निर्माण होत आहे. माती, रेती अथवा दगड यांची वाहतूक बंदिस्त वाहनातून अथवा त्यावर आवरण टाकून करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याचे सायन-पनवेल मार्गावर दिसून येत आहे. मालवाहतूक करणारे हे डम्पर निष्काळजीपणे अती वेगात पळवले जात असल्याने अपघातांचा धोका निर्माण होत आहे.सायन-पनवेल मार्गाची अनेकदा डागडुजी झाल्याने ठिकठिकाणी चढ-उतार तयार झाले आहेत. त्याठिकाणी भरधाव डम्पर आपटून त्यामधील खडी, रेती उडून रस्त्यावर जागोजागी सांडत आहे. यामुळे मार्गालगत सर्वत्र रेतीचे थर साचलेले दिसतात. शिवाय डम्परमधून उडणाºया खडी अथवा मातीमुळे पाठीमागून येणाºया दुचाकीस्वारांच्या डोळ्यात धूळफेक होते. याच प्रकारामुळे शहरातील धूलिकणांमध्ये वाढ होत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र उघड्या डम्परमधून दगडांची वाहतूक होत असताना, एखादा दगड उडून रस्त्यावर पडल्यास पाठीमागून येणाºया वाहनांचा गंभीर अपघात घडू शकतो.बहुतांश डम्परमध्ये उघड्यावर मालवाहतूक करण्यास त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जातो. या अवस्थेत डम्पर वेगात पळवले जात असल्याने रस्त्यांची जलद गतीने झीज होत आहे. त्याच कारणाने पामबीच मार्गावर डम्परसारख्या जड वाहनांना पालिकेने बंदी घातलेली आहे. यानंतरही रहदारीच्या दृष्टीने शहरातील महत्त्वाच्या मार्गावर नियमांची पायमल्ली करून उघड्यावर मालवाहतूक करणाºया डम्पर चालकांवर कारवाई होत नसल्याने वाहतूक पोलिसांसह आरटीओच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.नवी मुंबईतून मुंबईकडे बांधकाम साहित्याची वाहतूक करताना संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना पनवेल, नवी मुंबई व मुंबई आरटीओच्या कार्यक्षेत्रातून जावे लागते. त्यामुळे ओव्हरलोड मालवाहतूक तसेच उघड्यावर मालवाहतूक करणाºया डम्पर चालकांवर तीनपैकी एकातरी ठिकाणी कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्याने तिथल्या संपूर्ण यंत्रणेच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.तीन दिवसांपूर्वी एनआरआय पोलीस ठाण्यात एका डम्पर चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्या डम्परमध्ये क्षमतेपेक्षा सुमारे १४ हजार किलो जास्त माल भरलेला होता. शिवाय माल बंदिस्त न करताच त्याची वाहतूक केली जात होती. अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य राहिल्यास बांधकामाच्या साहित्याच्या वाहतुकीला शिस्त लागू शकेल. मात्र किल्ले जंक्शन येथूनच मोठ्या प्रमाणात इतरही डम्परमधून उघड्यावर मालाची वाहतूक होत असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मुंबई परिसरात कोट्यवधीची विकासकामे सुरू असून त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य नवी मुंबईच्या पनवेल, उलवे परिसरातून नेले जाते. त्याकरिता मुंबईला जोडणारा सायन-पनवेल एकमेव मार्ग असल्याने दिवस-रात्र जड अवजड वाहनांची रहदारी सुरू असते. मात्र अनेकदा मुंबईत जड वाहनांना निश्चित वेळीच प्रवेश दिला जातो. त्यामुळे वाशी टोलनाक्यापूर्वी अथवा सानपाडा, उरण फाटा यासह ठिकठिकाणी रस्त्यालगत कित्येक तास उभी केली जातात. यामुळे रहदारीला अडथळा होऊन अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई