कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी महापालिका मुख्यालसमोर इंटकचे उपोषण
By योगेश पिंगळे | Updated: August 9, 2023 12:20 IST2023-08-09T12:20:22+5:302023-08-09T12:20:50+5:30
यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात घोषण करण्यात आले. या आंदोलनाला युनियनचे पदाधिकारी आणी ठोक मानधनावर काम करणारे शेकडो कर्मचारी उपस्थित आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी महापालिका मुख्यालसमोर इंटकचे उपोषण
नवी मुंबई : महापालिकेच्या विविध विभागात तसेच नवी मुंबई परिवहन उपक्रमात मागील अनेक वर्षांपासून ठोक मानधन तत्वावर तुटपुंज्या वेतनावर कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ व्हावी, तसेच त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे विविध सुविधा लागू कराव्यात याव्यात, यासाठी (इंटक) राष्ट्रीय मजदूर काँग्रेस संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून बुधवारी सिबिडी बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर, नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वात बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरु आहे.
यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात घोषण करण्यात आले. या आंदोलनाला युनियनचे पदाधिकारी आणी ठोक मानधनावर काम करणारे शेकडो कर्मचारी उपस्थित आहेत.