शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
3
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
4
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
5
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
6
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
7
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
8
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
9
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
10
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
11
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
12
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
13
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
14
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
15
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
16
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
17
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
18
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
19
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
20
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

इन्फ्लुएंझा लहान मुलांसाठी ठरतोय धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 1:01 AM

इन्फ्लुएंझा हा शब्द इटालियन भाषेतील शब्दावरून आला असून, त्याला ‘फ्लू’ या नावानेही ओळखले जाते.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : इन्फ्लुएंझा हे व्हायरस असून त्याची श्वासोश्वासामार्फत लागण होते. हा एक मानव, पशू, पक्ष्यांमध्ये आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. किडनी, लिव्हर हृदय संबंधित आजार असलेल्या लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांच्यासाठी हा आजार धोकादायक ठरत असून, या आजाराची माहिती व घ्यावयाची काळजी याविषयी भारतीय बालचिकित्सक अकादमीचे अध्यक्षडॉ. विजय येवले यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : इन्फ्लुएंझा म्हणजे काय?उत्तर : इन्फ्लुएंझा हा शब्द इटालियन भाषेतील शब्दावरून आला असून, त्याला ‘फ्लू’ या नावानेही ओळखले जाते. फ्लूचे आणखी व्हायरस असून, त्यामध्ये ताप, डोकेदुखी सारखे आजार होतात; परंतु इन्फ्लुएंझा (फ्लू) मध्ये जास्त प्रमाणावर ताप येऊन फ्लूचा निमोनिया होण्याची शक्यता जास्त प्रमाणावर असते.

प्रश्न : इन्फ्लुएंझा टाळण्यासाठी काय करता येऊ शकते?उत्तर : एखाद्या रोगजंतूंची लागण झाल्यावर शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते, त्यानंतर साधारण त्या रोगजंतूंची लागण पुन्हा त्या व्यक्तीला होत नाही; परंतु फ्लू हा स्मार्ट असून प्रत्येक वेळी रचना बदलतो त्यामुळे शरीरात तयार झालेली रोगप्रतिकार शक्ती लागू पडत नाही. नवीन व्हायरसला लागू पडेल अशी लस दरवर्षी नव्याने तयार केली जाते व बाजारात उपलब्ध असते.

प्रश्न : आजाराचा प्रसार कसा होतोे?उत्तर : हा आजार शिंकण्यातून उडलेले कण श्वासाद्वारे अथवा तोंडाद्वारे दुसऱ्याच्या शरीरात जाणे, रोग्याच्या शिंकेतील, खोकल्यातील अथवा थुंकीतील अतिशय छोट्या कणांचा श्वासाद्वारे संसर्ग, दूषित पृष्ठभागांद्वारे हाताशी, नाकाशी वा तोंडाशी होणाºया स्पर्शाद्वारे या आजाराचा संसर्ग होतो.प्रामुख्याने कोणत्या व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे?सहा महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे या संसंर्गजन्य आजाराची लागण लहान मुलांना तत्काळ होऊ शकते. किडनी, लिव्हर, हृदयाचे आजार, गरोदर स्त्रिया, लठ्ठपणा, मधुमेह यासारखे आजार असणाºया कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना फ्लू झाला तर ते गंभीर ठरू शकते. फ्लूची लस परिणामकारक असून त्यामुळे निमोनिया सारख्या आजारापासून संरक्षण होऊ शकते.उपाय- आजारी असलेल्या लोकांपासून दूर राहणे- आपण आजारी असाल तरी घरीच थांबा- सतत आपले हात साबण लावून धुणे- शिंकताना व खोकताना हात रुमालाचा वापर करा- सार्वजनिक जागेत थुंकू नकाबाजारात उपलब्ध असलेल्या परंतू शासनामार्फेत दिल्या जात नसलेल्या विविध लसींचा व आजाराच्या स्वरूपाचा अभ्यास करून कोणती लस किती फायदेशीर आहे हे इंडियन अकादमी आॅफ पीडीएट्स यांच्या मार्फत तपासले जाते. - डॉ. विजय येवले

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHealthआरोग्य