कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 06:32 IST2024-01-27T06:32:03+5:302024-01-27T06:32:11+5:30

मार्केटमध्ये अजून आंदोलक वास्तव्यास असल्याने शासनाने भाजीपाला थेट मुंबईत घेवून जाण्यास ही परवानगी दिली आहे.

Inflow of vegetables started in Agriculture Produce Market Committee | कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक सुरू

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक सुरू

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यरात्रीपासून भाजीपाल्याची आवक सुरू झाली आहे. दोन दिवस मार्केट बंद असल्यामुळे व रविवारी पुन्हा सुट्टी असल्याने आज मोठ्याप्रमाणात कृषीमाल मागविला आहे.

रात्री एक पासून भाजीपाल्याची आवक सुरू झाली आहे. मार्केटमध्ये अजून आंदोलक वास्तव्यास असल्याने शासनाने भाजीपाला थेट मुंबईत घेवून जाण्यास ही परवानगी दिली आहे.

Web Title: Inflow of vegetables started in Agriculture Produce Market Committee