तळोजा कारागृहात कैद्यामध्ये मारामारी, इंडियन मुजाहिद्दीनच्या हस्तकावर प्राणघातक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 23:01 IST2017-11-06T23:00:52+5:302017-11-06T23:01:06+5:30

तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये एका कैद्याने दुसऱ्या मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्याचे नाव नक्की अहमद शेख (वय.२८) असून तो इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हस्तक आहे.

Indian Mujahideen's handmade strike in Taloja Jail | तळोजा कारागृहात कैद्यामध्ये मारामारी, इंडियन मुजाहिद्दीनच्या हस्तकावर प्राणघातक हल्ला 

तळोजा कारागृहात कैद्यामध्ये मारामारी, इंडियन मुजाहिद्दीनच्या हस्तकावर प्राणघातक हल्ला 

पनवेल: तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये एका कैद्याने दुसऱ्या मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्याचे नाव नक्की अहमद शेख (वय.२८) असून तो इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हस्तक आहे.

नक्की अहमद शेख याच्यावर हल्ला करणारा अमीर मोहिद्दीन खान हा विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहे. पंधरा दिवसांपूर्वी काही कारणास्तव दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आज सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास हा राग मनात धरुन अमीर मोहिद्दीन खानने बाहेर पडताना धारदार पत्र्याने  नक्की अहमद शेख याच्या मानेवर मारल्याने त्यात तो जखमी झाला. कारागृह प्रशासनाने नक्कीवर उपचार करून खारघर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर खारघर पोलिसांनी अमीर मोहिद्दीन खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी खारघर पोलास ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी याप्रकरनी मीर मोहिद्दीन खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली.

Web Title: Indian Mujahideen's handmade strike in Taloja Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग