शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

वाढत्या रिक्षा परवान्यांमुळे डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 23:27 IST

शासनाने परवाने खुले केल्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या १२ हजारांवरून १७ हजार १७३ झाली आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : शासनाने परवाने खुले केल्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या १२ हजारांवरून १७ हजार १७३ झाली आहे. वाहनांची संख्या वाढली; पण स्टँड तेवढेच असल्यामुळे रेल्वेस्थानकासह प्रमुख चौकांमध्ये वाहतूककोंडीत भर पडली आहे. व्यवसायही कमी झाल्यामुळे परवाने बंद करा, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे व बसनंतर रिक्षा व्यवसायाचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी हा सर्वाेत्तम पर्याय आहे; परंतु शासनाचे धोरण आणि आरटीओसह वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे रिक्षा व्यवसाय ही समस्या बनू लागली आहे. सप्टेंबर २०१७ पूर्वी मनपा कार्यक्षेत्रामध्ये १२९९० रिक्षा होत्या. शासनाने परवाने खुले केल्यामुळे नवीन रिक्षा घेण्याची स्पर्धा सुरू झाली व सव्वा वर्षामध्ये तब्बल ४१८३ नवीन रिक्षा रोडवर आल्या आहेत. यामुळे या व्यवसायामधील स्पर्धा वाढली आहे. व्यवसाय कमी होऊ लागला आहे. स्टँडवर लांबच लांब रांगा लागू लागल्या आहेत. भाडे मिळविण्यासाठी ताटकळत बसावे लागते आहे. शहरात १६२ स्टँड असून, एवढ्या रिक्षा सामावून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. यामुळे दहा रिक्षा उभ्या करण्याची परवानगी असलेल्या स्टँडवर २० ते ३० रिक्षा उभ्या राहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पूर्ण रोडवर रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सर्वात गंभीर स्थिती रेल्वेस्थानक परिसरामध्ये आहे. येथील रांगा आटोक्यात कशा आणायच्या? हा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. बेशिस्तपणा करणारे काही चालक रांगेचा नियम पाळत नाहीत. हायमारी करून मध्ये घुसत आहेत, यामुळे शाब्दिक चकमक व मारामारीच्या घटनाही होऊ लागल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील रिक्षा संघटनांनी परवाने बंद करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी वाशीतील शिवाजी चौकामध्ये उपोषणही केले होते; परंतु यानंतरही अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. नवीन परवाने देण्याची प्रक्रिया सुरूच आहे. रिक्षांची वाढती संख्या ही सर्वांसाठीच डोकेदुखी बनत चालली आहे. वाहतूककोंडी, पार्किंगपर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेकांनी रिक्षा परवाने घेऊन ते चालविण्यासाठी लायसन्स व बॅच नसलेल्या परप्रांतीयांना दिले आहेत. टपोरी मुले रिक्षा चालवत असून ते प्रवाशांबरोबरही उद्धट वर्तन करत आहेत. या बेशिस्तपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे पोलीस व आरटीओ दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत ही समस्या सोडविली नाही तर भविष्यात रिक्षाचालकांमध्ये व प्रवाशांबरोबर वाद वाढून मारामारीचे गंभीर गुन्हे घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.>बेशिस्तपणा वाढलावाशी, सानपाडा, घणसोली, सीवूड व इतर रेल्वेस्थानकासमोर काही रिक्षाचालक रांगेत उभे न राहता रोडवरच वाहने उभी करून भाडे मिळविण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी होत असते. वाशीमध्ये रिक्षा संघटनेने प्रयत्न केले आहेत; परंतु यानंतरही अनेक जण घुसखोरी करत असून बेशिस्तपणा करून प्रामाणिक रिक्षाचालकांना बदनाम करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.>शहरातील रिक्षा संघटनांनी नवीन रिक्षा परमिट बंद करण्याची मागणी केली आहे. रिक्षाचे नवीन परिमट देण्यासंदर्भात शासनाचे धोरण आहे. संघटनांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने प्रत्येक वेळी शासनस्तरावर कळविण्यात येत आहे.- दशरथ वाघुले,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी>अधिकृत रिक्षा स्टँड वाढविण्याची गरजशहरात रिक्षांचे प्रमाण वाढल्याने अधिकृत रिक्षा स्टँड अपुरे पडू लागले आहेत. नवीन रिक्षा स्टँड निर्मितीसाठी प्रक्रि या राबवावी लागते. स्टँड बनविण्यासाठी आरटीओ अधिकारी, स्थानिक प्राधिकरण, वाहतूक पोलीस आणि स्टँड प्रतिनिधी यांच्या माध्यमातून संयुक्त सर्व्हे केला जातो. वाहतूककोंडी, जागेची उपलब्धता, प्रवाशांची मागणी या गोष्टी सर्व्हेमध्ये तपासल्या जातात. त्यानुसार स्टँडच्या यादीला शासनाकडून मंजुरी घ्यावी लागते. शहरातील सर्वच रिक्षा संघटनांनी आवश्यक असलेल्या रिक्षा स्टँडची एकत्र मागणी करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी रिक्षा संघटनांना केले आहे.>नेरुळ-सीबीडीत सकारात्मक प्रयत्नसीबीडी व नेरुळमध्ये रिक्षा संघटनांनी व काही दक्ष चालकांनी रांगेतच थांबण्याची सर्वांना सक्ती केली आहे. या ठिकाणी बºयापैकी रांगेचा नियम पाळला जात आहे. नेरुळमध्ये हायमारी करणारे काही चालक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. संघटनांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. संघटनेच्या प्रयत्नांना आरटीओ व पोलिसांनी सहकार्य करण्याची गरज आहे.>प्रवाशांशी उद्धट वर्तनरिक्षा परवाने वाढल्यामुळे अनेक परप्रांतीय व इतर टपोरी तरुण रिक्षा चालवू लागले आहेत. घणसोली, नेरुळ, एमआयडीसी व इतर ठिकाणी हे तरुण मनमानीपणे वागत असून प्रामाणिक रिक्षाचालकांनाही उद्धट बोलत आहेत. प्रवाशांशीही भांडणे करत असून मारामारी करण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ लागली आहे. नेरुळ पश्चिमेला एक प्रामाणिक रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटनाही नुकतीच घडली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई