शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
अब्जाधीश असूनही पान मसाल्याची जाहिरात का? यूट्यूबर ध्रुव राठीचे शाहरुख खानला गंभीर प्रश्न; पैशांचा हिशोब सांगितला
3
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
4
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
5
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
6
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
7
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
8
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
9
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
10
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
11
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
12
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
13
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
14
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
15
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
16
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
17
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
18
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
19
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
20
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...

डम्पिंग ग्राउंडसाठी अपुरी जागा, उरणमध्ये कचरा व्यवस्थापनाची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 00:47 IST

नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिदिन तयार होणाऱ्या ११ टन कच-याची विल्हेवाट लावताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

- मधुकर ठाकूरउरण : नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिदिन तयार होणाऱ्या ११ टन कच-याची विल्हेवाट लावताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कचरा व्यवस्थापनासाठी डम्पिंग ग्राउंडची जागा अपुरी पडत आहे. ओला व सुका कचरा वेगळा केला जात असला तरी नागरिकांकडून त्यासाठी फारसे सहकार्य मिळत नाही. रोडवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत असून, स्वच्छतेच्या कामात लोकसहभाग वाढविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.उरण नगरपालिकेची स्थापना होऊन १६२ वर्षे झाली आहेत. २.२९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर शहर वसलेल्या शहराची लोकसंख्या २८ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. इतर सर्व शहरांप्रमाणे उरण नगरपालिकेलाही कचºयाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात दररोज ११ टन कचरा जमा होतो. यामध्ये सुका आणि ओल्या कचºयाचा समावेश आहे. कचरा व्यवस्थापनासाठी सिडको, महसूल विभागाकडे नगरपालिकेने डम्पिंगसाठी २ हेक्टर जागेची मागणी केली होती. मात्र, जागाच उपलब्ध नसल्याची कारणे पुढे करीत डम्पिंग ग्राउंडसाठी जागा देण्यास शासकीय विभागाने चालढकलपणा चालविला होता. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर २००७ साली २ हेक्टरऐवजी १ हेक्टर जागा जिल्हाधिकाºयांनी उपलब्ध क रून दिली आहे. मात्र, डम्पिंग ग्राउंडसाठी देण्यात आलेली जागा अपुरी पडत असल्याने उनपला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.दररोज साठणारा ११ टन ओला, सुका कचरा उचलण्याचे काम सध्या तरी ठेकेदारी पद्धतीने केले जात आहे. यासाठी वार्षिक ९१ लाख रुपये खर्ची पडतात. ५० आणि ठेकेदाराचे ४५ सफाई कर्मचारी मिळून शहरातील कचरा उलचण्याचे काम केले जाते. सकाळच्या वेळेत कचरा उचलण्याचे काम करते. तसेच मासळी आणि भाजी मार्केटमध्ये दोन वेळा कचरा उचलला जातो. त्याशिवाय घंटागाडी फिरवून घरोघरी जाऊनही कचरा जमा केला जातो. जमा केलेला कचºयाची वाहतूक कंपार्टमेंट असलेल्या छोट्या गाड्यांनी केली जाते. दररोज जमा होणारा सुका ५.५० टन आणि ओला ५.५० टन असा एकूण ११ टन कचरा जमा करून वेगळा केला जातो. विगतवारी केलेल्या कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. घरोघरी जाऊन कचरा उचलला जात असला, तरी अनेक नागरिक रोडवर कचरा टाकत आहेत. कचरा वाहतुकीसाठी पालिकेची स्वत:ची वाहने नसल्यामुळे ठेकेदाराच्या मार्फत वाहने पुरविली जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत केंद्र आणि राज्याच्या मदतीने सात घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.>बायोगॅस निर्मिती करणारओल्या कचºयातून बायोगॅस निर्मिती करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. यासाठी बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून, लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बायोगॅस निर्माण करून त्याचा वापर इतर कारणांसाठी केला जाणार आहे.सद्यस्थितीमध्ये ओल्या कचºयातून खतनिर्मिती केली जात असून तीन रुपये किलो दराने खताची विक्री केली जात आहे. नगरपालिकेचे मख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले की, नगरपालिकेने स्वच्छतेच्या कामावर लक्ष दिले असून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत