पनवेल शहरात एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्षांचा मेळावा, दुसरीकडे शेकापचे आंदोलन

By वैभव गायकर | Updated: October 11, 2023 11:35 IST2023-10-11T11:34:04+5:302023-10-11T11:35:24+5:30

प्रशासन केवळ सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून कामे करीत असल्याचा आरोप शेकापने केला आहे.

In Panvel city, on one hand, the meeting of BJP state presidents, on the other hand, Shekap's movement | पनवेल शहरात एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्षांचा मेळावा, दुसरीकडे शेकापचे आंदोलन

पनवेल शहरात एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्षांचा मेळावा, दुसरीकडे शेकापचे आंदोलन

 वैभव गायकर

पनवेल: पनवेल शहरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पदाधिकाऱ्यांचा विजयी संकल्प मेळावा घेत असताना शहरातील शिवाजी चौकात बुधवार दि.11 रोजी शेकापने पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले आहे.          

प्रशासन केवळ सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून कामे करीत असल्याचा आरोप शेकापने केला आहे. ज्या शिवाजी चौकात बावनकुळे यांच्या स्वागतासाठी ढोल ताशे वाजवले जात आहेत त्याच चौकात शेकापने आंदोलन छेडत प्रशासनाला जाब विचारला आहे.माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे.आंदोलनकर्त्यांनी पोस्टर झळकावत काल पर्यंतचे पनवेल आणि आजचे पनवेल यामधील तुलना दाखवली आहे.पनवेलकरांची मोडली कंबर ,बावनकुळे येताच डांबरीकरण शहरभर अशा घोषणा शेकापच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या

Web Title: In Panvel city, on one hand, the meeting of BJP state presidents, on the other hand, Shekap's movement