गौतमीच्या कार्यक्रमात सापाचा ‘नागीन डान्स’, कामोठ्यात दर्शकांकडून खुर्च्यांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:44 IST2023-10-11T14:44:10+5:302023-10-11T14:44:48+5:30

या कार्यक्रमाला तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र कार्यक्रमात सापाच्या एंट्रीने एकच धावपळ उडाल्याचे पाहावयास मिळाले.

In Gautami's show, snake's naagin dance chairs were vandalized by viewers in kamothe | गौतमीच्या कार्यक्रमात सापाचा ‘नागीन डान्स’, कामोठ्यात दर्शकांकडून खुर्च्यांची तोडफोड

गौतमीच्या कार्यक्रमात सापाचा ‘नागीन डान्स’, कामोठ्यात दर्शकांकडून खुर्च्यांची तोडफोड

पनवेल : गौतमी पाटीलची क्रेज संपूर्ण महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे. पनवेलमधील कामोठ्यात प्रथमच राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी ९ ऑक्टोबर रोजी गौतमी पाटील आली होती. 

या कार्यक्रमाला तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र कार्यक्रमात सापाच्या एंट्रीने एकच धावपळ उडाल्याचे पाहावयास मिळाले. याच दरम्यान काही हुल्लडबाज दर्शकांनी कार्यक्रमात खुर्च्यांची तोडफोड करून राडा केल्याने पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी कारवाई करावी लागली.

पाेलिस असतानाही गाेंधळ
गौतमी येणार असल्याने पनवेलसह नवी मुंबईमधील तरुण कार्यक्रमाच्या ठिकाणी जमा झाले होते. कार्यक्रमात अनुचित प्रकार घडू नये म्हणून खासगी सुरक्षारक्षकांसह पोलिस बंदोबस्तदेखील ठेवला होता. यावेळी काही उत्साही तरुणांनी खुर्च्या उचलून एकमेकांवर भिरकावण्याचा प्रकार केला. दरम्यान कार्यक्रमाच्या मध्यंतरी अचानक साप शिरल्याने एकच पळापळ उडाली. एका तरुणाला साप चावल्याचीदेखील चर्चा याठिकाणी सुरू होती. मात्र, सापाने अचानक एन्ट्री केल्याने चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.

Web Title: In Gautami's show, snake's naagin dance chairs were vandalized by viewers in kamothe