शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

चीनबरोबरचा मेट्रो खरेदी करार रद्द होणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:32 IST

सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी चीनकडून मेट्रो कोच खरेदी केले जाणार आहेत. याला काही सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे

नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी चीनकडून मेट्रो कोच खरेदी केले जाणार आहेत. याला काही सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे; परंतु चायनामेड मेट्रोला होणारा विरोध अनाठायी असून, खरेदी करार आठ वर्षांपूर्वीचा असल्याचे सिडकोने स्पष्ट करण्यात आले आहे.नवी मुंबई मेट्रोचा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सिडकोने अत्याधुनिक दर्जाच्या चायना मेड मेट्रो कोच खरेदी केल्या आहेत. गेल्या आठवड्यात या मेट्रो कोचच्या हस्तांतरणाचा सोहळा चीनमध्ये पार पडला. दोन महिन्यांत आठपैकी दोन मेट्रो सिडकोच्या ताफ्यात दाखल होत आहेत; परंतु काही सामाजिक संघटनांनी प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे. सध्या चीन आणि भारतादरम्यान तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने चीनबरोबर केलेला मेट्रो खरेदीचा करार रद्द करावा, अशी मागणी सामाजिक संघटनेकडून केली जात आहे; परंतु सिडकोच्या वरिष्ठ सूत्राने ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण, चीनकडून मेट्रो खरेदी करण्याचा प्रस्ताव या प्रकल्पाच्या शुभारंभाच्या वेळचा म्हणजेच आठ वर्षांपूर्वीचा आहे. तसेच करारानुसार मेट्रो खरेदीसाठी लागणारी रक्कमही संबंधित कंपनीला अदा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हा करार रद्द करणे शक्य नसल्याचे या सूत्राने स्पष्ट केले आहे.