शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी मार्केटमध्ये अवैध कारखाने

By admin | Updated: November 12, 2015 02:07 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमध्ये मंगळवारी रात्री फटाक्यांमुळे आग लागली. या दुर्घटनेमुळे मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या बदाम

नामदेव मोरे, नवी मुंबईमुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमध्ये मंगळवारी रात्री फटाक्यांमुळे आग लागली. या दुर्घटनेमुळे मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या बदाम फोडण्याच्या कारखान्याचे बिंग उघडकीस आले आहे. महापालिकेची व एपीएमसीची परवानगी न घेताच या ठिकाणी कारखाने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. आशिया खंडामधील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी सर्व नियम धाब्यावर बसवू लागले आहेत. अनेक बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. मंगळवारी रात्री मसाला मार्केटच्या जी ३६ या गाळाला आग लागली. आगीमध्ये फारसे नुकसान झाले नसले, तरी या गाळ्यात बेकायदेशीर व्यापार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्केटमध्ये फक्त गोडाउनमध्ये माल ठेवता येतो. पोटमाळ्यावर व्यापाऱ्यांचे कर्मचारी, हिशेब वह्या यासाठी पेढी तयार करून दिली आहे, परंतु बहुतांश व्यापाऱ्यांनी चक्क दोन मजले बांधकाम केले आहे. आग लागलेल्या गाळ्यामध्येही गोडाउनच्या वर दोन पोटमाळे तयार केले होते. गोडाउनमध्ये बदाम फोडण्याचे एक व छतावर तीन मशीन ठेवण्यात आल्या आहेत. वास्तविक, शहरात धान्य दळण्याची चक्की सुरू करायची असली, तरी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. बाजारसमितीमध्ये बदाम फोडण्याचा कारखाना सुरू असून, त्यासाठी कोणतीच परवानगी घेतलेली नाही. ज्या गाळ्याच्या छतावर आग लागली, त्या व्यापाऱ्याने अनधिकृतपणे लाकडी शेडही बांधली होती. ती शेड पूर्णपणे जळूून गेली आहे. शेजारच्या चार गाळ्यांवरील शेडही जळाली आहे. सर्वच व्यापाऱ्यांनी बेकायदेशीरपणे व एपीएमसीची परवानगी न घेता, शेड टाकली आहेत. पोटमाळ्यावर बदाम निवडण्याचे काम केले जात आहे. गोडाउनमध्ये अत्यंत दाटीवाटीने माल ठेवण्यात आला आहे. आग लागली, तर ती विझविण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नव्हती. बाजारसमितीमधील जाणकारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अनेक ठिकाणी बदाम फोडण्याचे कारखाने विनापरवाना सुरू आहेत, परंतु त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. बाजारसमिती प्रशासनाने पूर्ण मार्केटचे सर्वेक्षण करून अतिक्रमण करणाऱ्या व बेकायदेशीरपणे गाळ्यांमध्ये कारखाना सुरू करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व संबंधितांवर मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली जात आहे. महापालिकेने ही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.