शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नवी मुंबईवासीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष सुरूच, उपचारासाठी मुंबईमध्ये जाण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 02:26 IST

महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयातील कोलमडलेली यंत्रणा पूर्ववत करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नवीन प्रवेश बंदच करण्यात आले आहेत.

नवी मुंबई : महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयातील कोलमडलेली यंत्रणा पूर्ववत करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नवीन प्रवेश बंदच करण्यात आले आहेत. पुरुष विभागात एकही रुग्ण नसून महिला विभागामध्ये फक्त एकच रुग्ण असून शहरवासीयांना उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.महापालिका प्रशासनाने १ मे रोजी प्रसिद्धिपत्रक काढून वाशीतील महापालिका रुग्णालयाचे कामकाज सुरळीत सुरू झाल्याचे स्पष्ट केले होते; परंतु अद्याप येथील कामकाज सुरळीत झालेले नाही. रुग्णालयामध्ये वैद्यकशास्त्र तज्ज्ञांची कमतरता असल्यामुळे नवीन रुग्णांना भरती करता येत नाही. सद्यस्थितीमध्ये अतिदक्षता विभागामध्ये फक्त २ रुग्ण उपचार घेत आहेत. ट्रॉमा केअर युनिटमध्ये ६ रुग्ण आहेत. पुरुष मेडिकल विभागामध्ये ३० बेडची क्षमता असून येथे एकही रुग्ण नाही. महिला विभागामध्ये २५ बेडची क्षमता असून फक्त एकच रुग्ण असल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. उपचारासाठी रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना डॉक्टर नसल्याचे सांगून इतर ठिकाणी जाण्यास सांगितले जात आहे. यामुळे शहरातील गरीब वस्तीमधील रुग्णांना नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात जावे लागत आहे.उपचारासाठी सुरू असलेल्या धावपळीमुळे प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकांना नाईलाजाने खासगी रुग्णालयामध्ये जावे लागत असून कर्ज काढून उपचार करावे लागत आहेत. मनपा रुग्णालयाची झालेली स्थिती पाहून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका अर्थसंकल्पामध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य विभागावरील खर्च वाढत असून नागरिकांना चांगले उपचार मिळत नाहीत. अजून किती वर्षे गैरसोय सहन करायची असा प्रश्नही उपस्थित केला.जबाबदार कोण?महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात यापूर्वी रुग्णांसाठी जागाही उपलब्ध होत नव्हती. अनेक वेळा जमिनीवर बेड ठेवून रुग्णांवर उपचार करावे लागत होते. ३५० बेडच्या रुग्णालयामध्ये जेमतेम १५० रुग्णांवरच उपचार करावे लागत आहेत. अतिदक्षता विभाग, ट्रॉमा केअर, पुरुष व महिला विभागामधील बेड मोकळे आहेत. डॉक्टर नसल्याने रुग्णांना सेवा देता येत नसून या स्थितीला जबाबदार कोण असा प्रश्नही शहरवासी विचारू लागले आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य