पत्नीला त्रास देणाऱ्याचे पतीने फोडले डोके
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 06:56 IST2024-12-22T06:55:56+5:302024-12-22T06:56:03+5:30
जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक

पत्नीला त्रास देणाऱ्याचे पतीने फोडले डोके
नवी मुंबई : पत्नीला त्रास देणाऱ्याला मारहाण करत फरशीने डोके फोडल्याची घटना शुक्रवारी वाशी स्थानकाबाहेर घडली आहे. यात मारहाण झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिसार्ट उघड्यावर राहणाऱ्या कुटुंबातील एका महिलेची तिथून जाणाऱ्या व्यक्तीने छेड काढली. हा प्रकार महिलेच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर त्याने या व्यक्तीला मारहाण करत घटनास्थळी पडलेली लादी डोक्यात मारली. यामध्ये ही व्यक्ती गंभीर जखमी होताच रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी नेमलेल्या सुरक्षारक्षकांनी दोघांचे भांडण सोडवले. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असून, या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.