महापे एमआयडीसीत आढळली मानवी कवटी, कुत्र्याने आणून टाकल्याचे सीसीटीव्हीत उघड 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 7, 2022 23:35 IST2022-10-07T23:33:09+5:302022-10-07T23:35:45+5:30

महापे एमआयडीसी परिसरातील एका कंपनी बाहेर हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी मानवी कवटी असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.

Human skull found in Mahape MIDC, CCTV revealed that it was brought by a dog | महापे एमआयडीसीत आढळली मानवी कवटी, कुत्र्याने आणून टाकल्याचे सीसीटीव्हीत उघड 

महापे एमआयडीसीत आढळली मानवी कवटी, कुत्र्याने आणून टाकल्याचे सीसीटीव्हीत उघड 

नवी मुंबई : महापे एमआयडीसीमध्ये मानवी कवटी आढळून आल्याची घटना घडली आहे. अधिक तपासात कुत्र्याने ती त्याठिकाणी आणून टाकल्याचे सीसीटीव्हीमुळे समोर आले. दरम्यान त्याने ही कवटी स्मशानभूमी, दफनभूमी याठिकाणावरून आणली की इतर कुठून याचा तपास पोलीस करत आहेत. 

महापे एमआयडीसी परिसरातील एका कंपनी बाहेर हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी मानवी कवटी असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी त्याठिकाणी पाहणी केली असता पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मानवी कवटी आढळून आली. परिसरातल्या कंपनीच्या सीसीटीव्ही तपासात १ ऑक्टोबरला एका कुत्र्याने ही कवटी त्याठिकाणी आणून टाकल्याचे समोर आले. त्यानुसार ही कवटी पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमद्ये पाठवली आहे. दरम्यान त्या कुत्र्याने ही कवटी कुठून आणली याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. ही कवटी एखाद्या स्मशानभूमीतून, दफनभूमीतून कुत्र्याने आणली ? कि कुठे पडून असलेल्या मृतदेहाची हि कवटी आहे ? याचा अधिक तपास रबाळे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

 

Web Title: Human skull found in Mahape MIDC, CCTV revealed that it was brought by a dog