Video: मोठ-मोठ्या क्रेन आल्या; मालगाडीचे डब्बे हटविण्याचे काम युद्धपातळीवर
By वैभव गायकर | Updated: October 1, 2023 10:00 IST2023-10-01T09:59:43+5:302023-10-01T10:00:55+5:30
अद्याप दोन डब्बे घटनास्थळी अडगळीत पडलेले आहेत.

Video: मोठ-मोठ्या क्रेन आल्या; मालगाडीचे डब्बे हटविण्याचे काम युद्धपातळीवर
वैभव गायकर
पनवेल - पनवेल नजीक शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास झालेल्या मालगाडीच्या अपघातातील डब्बे हटविण्याचे काम रविवारी युद्धपातळीवर सुरू आहे. चारपैकी दोन डब्बे काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असून अद्याप दोन डब्बे घटनास्थळी अडगळीत पडलेले आहेत.
या मोहिमेत रेल्वेची विराट विशेष ट्रेन बचावकार्यासाठी आणण्यात आली आहे.या व्यतिरिक्त 3 जेसीबी आणि 3 पोकलेन मदतकार्यासाठी घटनास्थळी आहे.प्रत्येकी एका डब्यावर तीन लोखंडी कोईल आहेत.या कोईलच्या वजनामुळेच आलेल्या दबावामुळे हा अपघात घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या अपघातात ट्रक देखल पूर्णपणे फाकला आलेला आहे.दरम्यान या मार्गावरून जाणा-या इतर प्रवासी लांब पल्ल्यांच्या गाड्या रोखून धरल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.
नवी मुंबई - मालगाडीची दुर्घटना झाली होती, आता डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. pic.twitter.com/1kjXB4YZ8n
— Lokmat (@lokmat) October 1, 2023