शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: गुन्हे दाखल केल्यावर नोकऱ्या कशा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 05:21 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात राज्यात ७,५०० तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत.

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात राज्यात ७,५०० तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे भविष्यात आरक्षण मिळाले, तरी गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना नोकºया कशा मिळतील, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला. मनसे कामगार सेनेच्या वाशीतील मेळाव्यात ते बोलत होते.महाराष्टÑात सध्या मराठापाठोपाठ इतर जातींच्या आरक्षणाचा मुद्दा पेटत आहे. परंतु सर्वच राजकीय पक्षांकडून आरक्षणाचे केवळ राजकारण केले जात आहे. एकीकडे तरुणांना पेटवायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. या वृत्तीमुळे गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या झालेल्या आंदोलनांमध्ये राज्यातील ७,५०० तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.आंदोलनांत सहभागी होऊन हिंसा पसरवणारे परप्रांतीय असल्याचे तपासात समोर येत आहे. मात्र, त्यांच्या कृत्यामुळे महाराष्टÑ बदनाम होत असल्याचे ते म्हणाले. देशात २४ लाख रोजगार उपलब्ध असतानाही सरकार भरती करत नसल्याच्या नेमक्या कारणांबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला.रस्त्यांवर गणेशोत्सव साजरा करण्याबाबत लादल्या जात असलेल्या मर्यादांबाबत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. छोट्याशा जागेतच गणपती बसवायचे असतील तर कपाटात बसवायचे का? असा टोलाही त्यांनी लगावला. रस्त्यावरील नमाज बंद केले जात नसल्याने सर्वधर्मीयांना सारखाच न्याय हवा असल्याचे उद्गार त्यांनी काढले.महाराष्टÑात बांगलादेशींचे मोहल्ले उभे राहत आहेत. त्याकरिता राज्याबाहेरून परप्रांतीयांचे लोंढे आणून झोपड्या उभारल्या जात असून, त्यांना एसआरएसारखी योजना देण्याच्या निमित्ताने पैसे कमवायचा धंदा सुरू असल्याचीही टीका ठाकरे यांनी केली.या वेळी मनसे नेता बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजित पानसे, आदित्य शिरोडकर, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे, गजानन काळे आदी उपस्थित होते.>नवी मुंबई पालिका कर्मचाºयांची कानउघाडणीराज ठाकरे यांनी मनसेतर्फे नवी मुंबईला ५० हजार कोटींची घोषणा केली, तसेच नवी मुंबई पालिका कर्मचाºयांचीही कानउघाडणी केली. केवळ पगारासाठी नोकरी करू नका. राज्य व देशाचे जागते पहारेकरी बनण्याचा सल्ला दिला. मात्र, पहारेकरी हा मोदींसारखा नसावा, असा चिमटा त्यांनी काढला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण