शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
3
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
4
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
5
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
6
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
7
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
8
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
9
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
10
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
11
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
12
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
13
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
14
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
15
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
16
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
17
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
18
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
19
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
20
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण

रुग्णालयांच्या इमारती धूळ खात पडून; नवी मुंबईकरांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:41 PM

उद्घाटन होऊन सात वर्षे झाल्यानंतरही या रुग्णालयांचा प्रश्न सोडविण्यात व पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात लोकप्रतिनिधी व प्रशासनास अपयश आले असून, महानगरपालिकेचेरु ग्णालय उपलब्ध नसल्याने शहरवासीयांची प्रचंड गैरसोय होत आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : शहरवासीयांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने १७० कोटी रु पये खर्च करून ऐरोली, नेरुळ व बेलापूरमध्ये तीन रु ग्णालयांचे बांधकाम केले आहे. २५० बेड्सची क्षमता असलेल्या या रुग्णालयांमध्ये फक्त माता-बाल रुग्णालयच चालविले जात आहे. मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सर्वसाधारण रु ग्ण सुरू करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही. उद्घाटन होऊन सात वर्षे झाल्यानंतरही या रुग्णालयांचा प्रश्न सोडविण्यात व पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात लोकप्रतिनिधी व प्रशासनास अपयश आले असून, महानगरपालिकेचेरु ग्णालय उपलब्ध नसल्याने शहरवासीयांची प्रचंड गैरसोय होत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने २००९ मध्ये नेरुळ व ऐरोलीमधील जुन्या माता-बाल रु ग्णालयांच्या जागेवर प्रत्येकी १०० बेड्सचे सर्वसाधारण रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले. बेलापूरमध्येही जिल्हा परिषदेकडून हस्तांतर केलेल्या आरोग्य केंद्राच्या जागेवर ५० बेड्सचे माता-बाल रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या तीनही रुग्णालयांचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण होऊन तेथे प्रत्यक्ष रु ग्णालय सुरू होणे अपेक्षित होते, परंतु विविध कारणांनी बांधकाम रखडत गेले व रुग्णालयांवरील खर्च वाढत गेला. नेरुळमधील रुग्णालयाच्या बांधकामासाठी ७२ कोटी ७४ लाख रुपये, ऐरोली रु ग्णालयासाठी ७४ कोटी ७४ लाख रु पये व बेलापूर रुग्णालयासाठी २३ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले. तीनही रुग्णालयांच्या बांधकामासाठी जवळपास १७० कोटी ६३ लाख रु पये खर्च करण्यात आला. फर्निचर, वैद्यकीय उपकरणे व इतर कामांसाठीही ३५ कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घाईगडबडीमध्ये या रुग्णालयांचे उद्घाटन करण्यात आले, परंतु प्रत्यक्षात २०१६ मध्ये ऐरोली व नेरुळमध्ये माता-बाल रु ग्णालय सुरू करण्यात आले. बेलापूरमध्येही गतवर्षी माता-बाल रुग्णालय सुरू केले आहे.ऐरोली व नेरुळ रु ग्णालयाला १०० बेड्सची मंजुरी असली, तरी त्यांची क्षमता प्रत्येकी ३०० बेड्सची आहे. येथे सर्वसाधारण रु ग्णालय सुरू करण्यास महानगरपालिकेला अपयश आले आहे. सर्वसाधारण रु ग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळच पालिकेकडे उपलब्ध नाही. २००९ पासून पुरेशा मनुष्यबळाची भरती करता आलेली नाही. शासनाने आरोग्य विभागातील कर्मचारी भरतीला हिरवा कंदील दाखविल्यानंतरही वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सद्यस्थितीमध्ये वाशीतील सर्वसाधारण रु ग्णालय बंद करून तेथे डेडिकेटेड कोविड रु ग्णालय सुरू केले आहे. यामुळे मनपाचे एकही सर्वसाधारण रु ग्णालय सुरू नाही. मनपाचे रु ग्ण नेरु ळमधील डॉ.डी.वाय. पाटील रु ग्णालयात पाठविले जात आहेत. स्वत:च्या इमारती उपलब्ध असूनही मनुष्यबळ नसल्याने, पालिकेला ऐरोली व नेरु ळ रु ग्णालय सुरू करता येत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.नागरिकांमध्ये नाराजी : नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतील प्रथम संदर्भ रु ग्णालयाचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनपाचे सर्वसाधारण रु ग्णालय उपलब्ध नाही. खासगी रु ग्णालयातील उपचार परवडत नाहीत. मनपाकडून लवकर सर्वसाधारण रु ग्णालय सुरू करावे, अशी मागणी होत आहेत. मनपाचे रु ग्णालय बंद झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.बेलापूर रु ग्णालयबेड क्षमता ५०खर्च २३ कोटी १५ लाखसद्यस्थिती माता-बालरु ग्णालय सुरूऐरोली रु ग्णालयबेड क्षमता १००खर्च ७४ कोटी ७४ लाखबांधकाम सुरू २००९ओपीडी सुरू २०१४सद्यस्थिती माता-बालरु ग्णालय सुरूमनुष्यबळ नसल्याने सर्वसाधारण रुग्णालय सुरू नाही.नेरु ळ रु ग्णालयबेड क्षमता १००खर्च ७२ कोटी ७४ लाखबांधकाम सुरू २००९ओपीडी सुरू २०१४सद्यस्थिती माता-बालरु ग्णालय सुरूमनुष्यबळ नसल्याने सर्वसाधारण रुग्णालय सुरू नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNavi Mumbaiनवी मुंबई