शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यापेक्षा कचऱ्यावर जास्त खर्च

By admin | Updated: September 3, 2015 03:05 IST

शहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात महापालिकेस अपयश आले आहे. तीन वर्षांमध्ये वैद्यकीय सेवांवर २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

नामदेव मोरे, नवी मुंबईशहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात महापालिकेस अपयश आले आहे. तीन वर्षांमध्ये वैद्यकीय सेवांवर २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. घनकचरा व मलनि:सारण विभागावर तब्बल ३४८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. करोडो रुपये खर्च करूनही शहरवासीयांना चांगल्या उपचारासाठी खासगी रुग्णालय व मुंबईला जावे लागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सुविधा पूर्णपणे कोलमडली आहे. तुर्भे व नेरूळमधील माताबाल रुग्णालय बंद करण्यात आले आहे. कोपरखैरणे व ऐरोली माताबाल रुग्णालय फक्त नावापुरते सुरू आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा देता यावी यासाठी पालिकेने २००९ मध्ये ऐरोली, नेरूळ व बेलापूरमध्ये ८३ कोटी ४६ लाख रुपये खर्च करून तीन नवीन रुग्णालये बांधण्याचे काम सुरू केले होते. परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे हा खर्च १७० कोटी ६४ लाख रुपयांवर पोहचला आहे. रुग्णांसाठी फक्त वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचाच पर्याय शिल्लक राहिला आहे. त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे डॉक्टर रुग्णांना खाजगी रुग्णालय किंवा मुंबईला जाण्यास भाग पाडत आहेत. शहरात डेंग्यू, मलेरियाची प्रचंड साथ सुरू आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नगरसेवकांच्या मुलालाही डेंग्यू झाला होता. अशा स्थितीमध्ये महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. मागील तीन वर्षांमध्ये आरोग्य सुविधेवर तब्बल २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पाच वर्षांत औषध खरेदीवर ११ कोटी खर्च झाला असून रुग्णवाहिकेसाठी १ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा प्रचंड खर्च करूनही शहरवासीयांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. महापालिकेने थेट वैद्यकीय सुविधेवर तीन वर्षामध्ये २०० कोटी खर्च केले असून आरोग्याशी संबंधित असणाऱ्या घनकचरा विभागावर मात्र याच कालावधीमध्ये २३० कोटी ९५ लाख व मलनि:सारण विभागावर ११७ कोटी २९ लाख रुपये खर्च केले आहेत. वैद्यकीय खर्चापेक्षा हा खर्च दीडपट जास्त आहे. मलनि:सारण विभागावर प्रचंड खर्च करूनही अद्याप ७० टक्के झोपडपट्टीवासीयांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. कोपरखैरणे, नेरूळ पूर्व व पश्चिम, सीवूड या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालयच नाही. ठाणे बेलापूर रोड, पामबीच रोडवरही प्रसाधनगृह उभारण्यात आलेले नाही. कचरा उचलणे व वाहतुकीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. कचरा उचलल्यानंतर तिथे कीटकनाशक पावडर टाकली जात नाही. साफसफाई ठेकेदारही या पावडरचा वापर करत नाहीत. शहरात डासांचा उपद्रव रोखण्यासाठी धुरीकरण व औषध फवारणी योग्यप्रकारे होत नसून या सर्वांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.