शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
2
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
4
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
5
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
6
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
7
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
8
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
9
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
10
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
11
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
12
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
13
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
14
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
15
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
16
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
17
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
18
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
20
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार

अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 07:51 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांसह फळांची आवक रोडावली

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : राज्यातील अतिवृष्टीचा परिणाम कृषी व्यापारावरही झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला व फळांच्या आवकेवर मोठा परिणाम झाला आहे. तुटवड्यामुळे हिरव्या मिरचीचे दर दुप्पट झाले असून ते ८० ते १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. तसेच मोसंबी व पपईची आवक कमी झाली असून सीताफळाची आवकही ठप्प झाली आहे. शिवाय खराब झालेला कृषीमाल फेकूनही द्यावा लागत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. फळबागांसह भाजीपालाही वाहून गेला आहे. राज्यात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन नंदुरबार जिल्ह्यात होते. संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा परिणाम मुंबईतील पुरवठ्यावरही झाला आहे. गत आठवड्यात रोज सरासरी १५५ टन आवक होत होती. सोमवारी फक्त ६९ टन आवक झाली. होलसेल मार्केटमध्ये भाव २० ते ५० रुपये किलोवरून ४० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये मिरची ८० ते १५० रुपये किलो दराने विकली जात आहे. फ्लाॅवर, बीट, घेवडा, कोबी, ढोबळी मिरचीच्या दरामध्येही वाढ झाली आहे. 

पावसामुळे फळबागांचेही नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पपईचे प्रचंड नुकसान झाले आहे. गत आठवड्यात रोज १२० ते १५० टन पपईची आवक होत होती. सोमवारी ती ३८ टनावर आली. जालनामधील बागांचे नुकसान झाल्यामुळे मोसंबीची आवकही ३०० ते ३२५ टनावरून ११० टनावर आली आहे. सीताफळाची आवक जवळपास ठप्प झाली आहे. 

फळमार्केटमध्ये पपई, मोसंबी व सीताफळाच्या आवकवर परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे बागांचे नुकसान झाले असून पुढील काही दिवस आवकवर परिणाम राहील. हिमाचल व काश्मीरच्या सफरचंदची सर्वाधिक आवक होत आहे.संजय पानसरे, संचालक, फळमार्केट 

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Rot Crops; Chili Prices Double Due to Shortage

Web Summary : Heavy rains severely impacted Maharashtra's agriculture, damaging crops and disrupting supplies to Mumbai's market. Chili prices doubled, reaching ₹150/kg due to scarcity. Papaya, sweet lime, and custard apple supplies also dwindled, with significant losses reported in Nandurbar and Jalna. Fruit and vegetable prices are expected to remain high.
टॅग्स :Rainपाऊसfruitsफळेvegetableभाज्या