नवी मुंबईत जोरदार पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

By नारायण जाधव | Updated: June 23, 2023 15:29 IST2023-06-23T15:28:03+5:302023-06-23T15:29:03+5:30

घणसोलीसह नवी मुंबई परिसरात जोरदार कोसळल्या सरी

Heavy rain in Navi Mumbai relief to citizens from heat | नवी मुंबईत जोरदार पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

नवी मुंबईत जोरदार पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

नवी मुंबई: गेल्या पंधरवड्यापासून आपल्या आगमनासाठी तारीख पे तारीख देऊन हुलकावणी देणाणाऱ्या वरुणराजाने आज सकाळी नवी मुंबईत अखेर जोरदार एन्ट्री केली. नवी मुंबईतील घणसोली सह परिसरात जोरदार सरी कोसळल्याने घामाळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

यंदा अलनिनोच्या प्रभाव अन् त्यातच अरबी समुद्रात उद्भवलेल्या बिपरजॅाय वादळामुळे मान्सून केरळच्या वेशीवरच अडकला. त्यामुळे आधी ११ जून नंतर १५,१८ जून अशा तारखांवर तारखा हवामान खात्याकडून देण्यात येत होत्या. बिपरजॅायचा प्रभाव ओसल्यानंतर तो तळ कोकणच्या भूमिस स्पर्शून गेला. पण तो पुढे सरकत नव्हता. अखेर मुंबईसह राज्यात तो २३ ते २५ जून दरम्यान विदर्भ मार्गे येण्याची वर्दी देईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच नवी मुंबईतील घणसोली परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने घामाळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे

Web Title: Heavy rain in Navi Mumbai relief to citizens from heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस