कांद्यासह भाजीपाल्याच्या दरांत प्रचंड घसरण, शेतकऱ्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:38 AM2020-01-08T05:38:35+5:302020-01-08T05:38:42+5:30

नवीन वर्षामध्ये आवक वाढल्याने कांद्यासह भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत.

Heavy fall in vegetable prices with onion, loss of farmers | कांद्यासह भाजीपाल्याच्या दरांत प्रचंड घसरण, शेतकऱ्यांचे नुकसान

कांद्यासह भाजीपाल्याच्या दरांत प्रचंड घसरण, शेतकऱ्यांचे नुकसान

googlenewsNext

नवी मुंबई : नवीन वर्षामध्ये आवक वाढल्याने कांद्यासह भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. कोबीची प्रतिदिन सरासरी ४०० टन आवक होत असून, घाऊक बाजारामध्ये दर चार ते आठ रुपये झाले आहेत. फ्लॉवर, टोमॅटोचे दरही कमी होऊ लागले आहे. दर नियंत्रणामध्ये आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी कृषिमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे.
राज्यभर २०१९ साली कृषिमालाचे दर गगनाला भिडले होते. कांदा दरवाढीने नवे प्रस्थापित केले होते. कांद्याचे नवीन पीक विक्रीसाठी येऊ लागले आहे. कांद्याचे दर गेल्या आठवड्यामध्ये ४५ ते ६५ व मंगळवारी ४० ते ५० रुपये किलो झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही कांदा ५० ते ६० रुपये किलो दराने आहे. कोबीचा दर एक आठवड्यात निम्यावर आला आहे. गत आठवड्यामध्ये प्रतिकिलो १६ ते २२ रुपये भाव मिळत होता. सद्यस्थितीत हे दर चार ते आठ रुपये प्रतिकिलो आहेत. गुजरातवरून मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर घसरल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
बाजार समितीमध्ये फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, भेंडी, दुधी भोपळा, गाजर, कारली, ढोबळी मिर्ची, दोडका आणि वाटाण्याचे दरही घसरले आहेत. सद्यस्थितीमध्ये पुणे, नाशिक, गुजरात व इतर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मार्केटमध्ये मंगळवारी तब्बल चार हजार टन भाजीपाला, कांदा, बटाटा व लसूणची आवक झाली आहे. सर्वाधिक एक हजार टन आवक बटाट्याची झाली.
>लसणाचे दर वाढले
कांदा व इतर भाज्यांचे दर कमी झाले असले, तरी लसणाचे दर मात्र वाढू लागले आहेत. बाजारसमितीमध्ये मागील आठवड्यामध्ये लसूण ३० ते ९० रुपये किलो दराने विकला जात होता. मंगळवारी हे दर ५० ते ११० रुपये झाले आहेत. थंडी सुरूझाल्यापासून भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. आहे.कोबी, फ्लॉवरची राज्यभरातून तसेच गुजरातवरून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर घसरले.
शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधी, भाजी मार्केट
>‘एपीएमसी’तील बाजारभाव पुढीलप्रमाणे
वस्तू ३१ डिसेंबर ७ जानेवारी
कांदा ४५ ते ६५ रुपये ४० ते ५० रुपये
कोबी १६ ते २२ ४ ते ८
फ्लॉवर १२ ते २० १० ते १५
टोमॅटो १४ ते २४ १० ते २०
वांगी २० ते ३२ १० ते २६
भेंडी २८ ते ४० २२ ते ३६

Web Title: Heavy fall in vegetable prices with onion, loss of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.