शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

आरोग्य धोक्यात : घणसोलीत नळाद्वारे दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 2:25 AM

आरोग्य धोक्यात : पाण्यातून किडे आल्याने नागरिक संतप्त

नवी मुंबई : गेल्या एक ते दीड महिन्यांपासून घणसोलीत गावदेवी वाडी परिसरातील २०० पेक्षा अधिक नागरिकांना नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाण्यातून जंतू, किडे येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील अनेकजण ताप, सर्दी, पोटदुखीसारख्या आजाराने ग्रस्त आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने गावदेवी वाडीत पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत महापालिका प्रशासनाचा निषेध केला. पाणीपुरवठा विभागाने नवीन जलवाहिनी टाकली आहे, त्यासाठी खोदलेला खड्डा बुजवलेला नाही. एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे महापालिकेकडून येणारे पाणी दूषित असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे गावदेवी वाडीतील १५ पेक्षा जास्त व्यक्ती विविध आजाराने ग्रस्त आहेत. उघड्या गटारालगत असलेल्या जलवाहिनीला गळती असल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले.महापालिकेकडून मुख्य जलवाहिनीतून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होतो. मात्र, काही रहिवाशांनी नळ कनेक्शन गटारातून घेतले आहेत, त्यामुळे पाणी दूषित झाले असून याबाबत शोध घेतला जाईल, असे आश्वासन महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल नेरपगार यांनी दिले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी