शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हापूसची पहिली पेटी एपीएमसीत दाखल; प्रतिडझन दोन हजार रुपये बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 01:30 IST

फळांच्या व्यापारामध्ये आंब्याला, विशेषत: हापूसला विशेष महत्त्व आहे. 

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) गुरुवारी देवगडमधून हापूसच्या १२ पेट्यांची आवक झाली आहे. एपीएमसीमध्ये प्रतिडझन दोन हजार रुपये या दराने आंब्याची विक्री झाली. गतवर्षीपेक्षा पहिली पेटी तब्बल तीन महिने उशिरा दाखल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

फळांच्या व्यापारामध्ये आंब्याला, विशेषत: हापूसला विशेष महत्त्व आहे. मुुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशातील सर्वांत जास्त आंबा विक्री होत असते. गत हंगामामध्ये ५ नोव्हेंबर २०१८ ला पहिली पेटी विक्रीसाठी आली होती. पहिल्या पेटीवर त्या वर्षी हंगाम कसा राहील याचा अंदाज बांधला जातो. या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे मोहोर उशिरा आला असून, पहिली पेटी मार्केटमध्ये येण्यासही उशीर झाला. सिंधुदुर्ग तालुक्यामधील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावामधील शेतकरी अरविंद वाळके यांनी हापूसच्या१२ पेट्या विक्रीसाठी पाठविल्या आहेत. संजय पानसरे यांच्याकडे आंबा विक्रीसाठी आला आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये प्रतिडझन २ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. याविषयी माहिती देताना संजय पानसरे यांनी सांगितले,कोकणासह सर्वत्र या वर्षी मोहोर उशिरा आला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्येही आंबा मोहोर उशिरा आला असल्यामुळे नियमित हंगाम मार्चच्या अखेरपासून सुरू होईल. १५ ते २० एप्रिलदरम्यान आंबा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती