कोपर खैरणेतून गुटखा विक्रेत्याला अटक, घरातून १ लाख ८३ हजाराचा गुटखा जप्त

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 30, 2023 17:09 IST2023-03-30T17:09:03+5:302023-03-30T17:09:35+5:30

लक्ष्मीनारायण झा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुटखा विक्रेत्याचे नाव आहे.

Gutkha seller arrested from Kopar Khairan, Gutkha worth 1 lakh 83 thousand seized from his house | कोपर खैरणेतून गुटखा विक्रेत्याला अटक, घरातून १ लाख ८३ हजाराचा गुटखा जप्त

कोपर खैरणेतून गुटखा विक्रेत्याला अटक, घरातून १ लाख ८३ हजाराचा गुटखा जप्त

नवी मुंबई : कोपर खैरणे येथून पोलिसांनी १ लाख ८३ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. राहत्या घरामध्ये या गुटख्याची साठवणूक करून त्याची विक्री केली जात होती. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लक्ष्मीनारायण झा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. तो कोपर खैरणे सेक्टर १८ रूम नंबर ७३४ येथे राहणारा आहे. त्याठिकाणी तो गुटखा साठा व विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे उपायुक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिसांच्या पथकाने बुधवारी पहाटे त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी झा याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याठिकाणी गोणीत साठवलेला १ लाख ८३ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. याप्रकरणी त्याच्यावर कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Gutkha seller arrested from Kopar Khairan, Gutkha worth 1 lakh 83 thousand seized from his house