शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीचा कर्मचारी ठरला स्वच्छतादूत

By admin | Updated: December 21, 2015 01:32 IST

शहरातील झगमगाट...तेथील लाइफ स्टाईल... आणि रोजच्या धावपळीच्या आयुष्यापासून दूरवर ३२ आदिवासी कुटुंब निसर्गाच्या सान्निध्यात राहतात

आविष्कार देसाई,  अलिबागशहरातील झगमगाट...तेथील लाइफ स्टाईल... आणि रोजच्या धावपळीच्या आयुष्यापासून दूरवर ३२ आदिवासी कुटुंब निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. रोज कष्ट करून जीवन जगणाऱ्या या आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. निसर्गालाच सर्वस्व मानणाऱ्यांना वैयक्तिक शौचालयाचे महत्त्व कसे असणार. मात्र कर्जत तालुक्यातील बोरीवली ग्रामपंचायतीमधील एका कर्मचाऱ्याला आदिवासींच्या मनात स्वच्छतेचे महत्त्व बिंबविण्यात यश आले. त्याने स्वखर्चाने सर्व कुटुंबांना वैयक्तिक शौचालये बांधून दिली आहेत.बोरीवली ग्रामपंचायतीचे कर्मचारी नरेश भोईर असे त्यांचे नाव असून त्यांनी स्वच्छतेचे महान कार्य करीत सर्वांना एक आदर्श घालून दिला आहे. ३२ वैयक्तिक शौचालयांसाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे त्यांनी तीन लाख ८४ हजार रु.खर्च केले आहेत. सरकारकडून त्यांना खर्च केलेली रक्कम परत मिळणार असली, तरी स्वच्छतेबाबत भोईर यांची सामाजिक जाणीव महत्वाची आहे. रामाची वाडी या आदिवासी वाडीवर ३२ कुटुंबे राहतात. त्यांच्याकडे वैयक्तिक शौचालये नव्हती. भोईर यांनी तेथील कुटुंबांना शौचालय आणि स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले. सरकारच्या योजनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांच्याशी संपर्क साधला. स्वच्छता मिशनची टीम रामाची वाडी या आदिवासी वाडीवर पोचली. त्यावेळी आदिवासी बांधवांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. सर्व आदिवासी कुटुंब स्वच्छतेच्या महान कार्यात सहभागी झाल्याबाबत त्यांचेही आभार मानले. सर्वांना पुष्पगुच्छ देऊन साळुंखे यांनी सत्कार केला. यावेळी जि.प सदस्य सुरेश पेमारे, अ‍े. बी. थुळे आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते.