शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

#GoodBye2017: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 2:34 AM

नवी मुंबई : नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

नवी मुंबई : नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. याकरिता शहरातील महत्त्वाच्या मार्गावर नाकाबंदीसह शुक्रवार रात्रीपासूनच महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याशिवाय पथनाट्य व कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना व्यसनमुक्तीचाही संदेश देण्यात येत आहे.मागील काही वर्षांत अनपेक्षित घटनांमुळे ३१ डिसेंबरच्या रात्रीला गालबोट लागत चालले आहे. भारतीय संस्कृती पायदळी तुडवत मद्यपान करून नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा तरुणांमध्ये पडत चालली आहे. तर व्यावसायिक उद्देश साध्य करण्यासाठी हॉटेल, बार तसेच पबचालकांनी ही आधुनिक प्रथा टिकवून ठेवली आहे. त्याकरिता थर्टीफर्स्टच्या निमित्ताने पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अशा पार्ट्यांमध्ये मद्यपान अथवा अमली पदार्थांचे सेवन करून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, पोलिसांना थर्टीफर्स्टची रात्र बंदोबस्तात घालवावी लागत आहे. गतवर्षी वाहतूक पोलिसांकडून नववर्षाच्या पहाटेपर्यंत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या ३१९ कारवाया करण्यात आल्या होत्या. यानुसार यंदाही शहर व वाहतूक पोलिसांचा शुक्रवार रात्रीपासूनच चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक पोलीसठाण्याच्या हद्दीतले रस्ते, पाम बीच मार्ग, तसेच ठाणे-बेलापूर व सायन-पनवेल महामार्गावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. एखाद्या वाहनचालकाच्या हालचालीवर संशय आल्यास त्याची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशिनद्वारे तपासणी करून मद्यपान केले आहे का? हे तपासले जाणार आहे. अशा मद्यपी चालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची फिरती पथकेही तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय स्पीड गनद्वारे वाहनांवर नजर ठेवून, वेग मर्यादा ओलांडणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. अनेकदा पाम बीच मार्गावर तरुणांकडून वाहनांची रेस लावली जाते. त्यावर आळा घालण्यासाठी काही ठिकाणी बॅरिगेट्सही लावले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन होणार नाही, अशा पद्धतीनेच सहकुटुंब थर्टीफर्स्ट साजरा करून आनंदात नववर्षाचे स्वागत करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.>तळीरामांवर करडी नजरपनवेल : नवीन वर्षाच्या स्वागताला काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यातच ३१ डिसेंबर म्हटले की, मद्यपींच्या आनंदाला पारावार राहत नाही. आगामी नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्यप्राशन करून वाहने चालवणाºयांवर पनवेल वाहतूक पोलिसांनी करडी नजर ठेवण्यास सुरु वात केली आहे.>थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. तरुणांनी मद्यपानाचे सेवन टाळून कुटुंबासोबत आनंद साजरा करणे काळाची गरज बनली आहे. त्याकरिता पोलिसांतर्फे व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेऊन तसेच पथनाट्याद्वारे जनजागृती केली जात आहे.- डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उपआयुक्त- परिमंडळ १मद्यपान केल्यानंतर वाहन चालवल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. गतवर्षी थर्टीफर्स्टला ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या ३१९ कारवाया केल्या होत्या. त्यानुसार यंदाही थर्टीफर्स्टच्या निमित्ताने दोन दिवस ठिकठिकाणी नाकाबंदी करून मद्यपीचालकांवर कारवाई केली जाणार आहे.- नितीन पवार, उपआयुक्त- वाहतूक

टॅग्स :Policeपोलिस